8th Pay Commission | केंद्र सरकारने (Central Government) नुकतेच आठव्या वेतन आयोगावर (8th Pay Commission) शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना (Government Employees) आठव्या वेतन आयोगाची प्रतीक्षा लागून राहिली आहे. आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात (Salary) चांगली वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वेतन आयोगाच्या शिफारशीनंतर पेन्शन (Pension) आणि पगारात 15 ते 30 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. परंतु, काही तज्ज्ञांनी (Experts) मात्र यापेक्षा कमी वेतनवाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी जानेवारी 2026 च्या सुरुवातीला आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू होणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आठव्या वेतन आयोगावर चर्चा सुरू झाली आहे. विविध तज्ज्ञ वेगवेगळे अंदाज व्यक्त करत आहेत. 1 जानेवारी 2026 पासून या शिफारशी लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही विशेष कारणामुळेच या शिफारशी लागू होण्यास उशीर होऊ शकतो. वेतन आयोग लागू करण्यास विलंब झाल्यास त्याचा फरक (Arrears) कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.
अशी असू शकते वेतनवाढ
7 व्या वेतन आयोगाअंतर्गत (7th Pay Commission) फिटमेंट फॅक्टर (Fitment Factor) 2.57 होता. यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन (Basic Salary) 7,000 रुपयांवरून 18,000 रुपये करण्यात आले होते. 8 व्या वेतन आयोगामध्ये जास्तीत जास्त फिटमेंट फॅक्टर 2.86 असण्याची शक्यता आहे. त्यामुळे किमान मूळ वेतन 51,480 रुपयांपर्यंत वाढू शकते. मूळ वेतन 41,000 ते 51,480 रुपयांच्या दरम्यान असेल, असा अनेक तज्ज्ञांचा अंदाज आहे. मात्र, भारताचे माजी वित्त सचिव (Former Finance Secretary) सुभाष चंद्र गर्ग (Subhash Chandra Garg) यांनी एका मुलाखतीत 2.86 टक्के फिटमेंट फॅक्टर अशक्य असल्याचे म्हटले आहे. (8th Pay Commission)
राज्य सरकारांवर शिफारशी लागू करणे बंधनकारक नाही
केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशी स्वीकारण्यास राज्य सरकारे (State Governments) बांधील नसतात. परंतु केंद्राच्या निर्णयानंतर बहुतांश राज्य सरकारे थोड्याफार बदलांसह शिफारशी लागू करतात. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी महाराष्ट्र (Maharashtra) आणि तामिळनाडूने (Tamil Nadu) काही बदलांसह स्वीकारल्या होत्या. केंद्र सरकार दर 10 वर्षांनी वेतन आयोग स्थापन करते. सध्याचा 7 वा वेतन आयोग 2014 मध्ये स्थापन करण्यात आला होता. त्याच्या शिफारशी सहाव्या वेतन आयोगाच्या (6th Pay Commission) अंमलबजावणीच्या 10 वर्षानंतर, म्हणजेच जानेवारी 2016 पासून लागू झाल्या होत्या.
थोडक्यात, आठव्या वेतन आयोगामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात नक्कीच वाढ होणार आहे. मात्र, ही वाढ किती असेल याबाबत वेगवेगळे अंदाज वर्तवले जात आहेत. आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी 1 जानेवारी 2026 पासून लागू होण्याची शक्यता आहे. (8th Pay Commission)
Title : 8th Pay Commission Salary Hike Expectations Experts Opinions






