महाराष्ट्रात रस्ते अपघातांची धक्कादायक आकडेवारी समोर, वर्षभरात ‘इतके’ अपघात वाढले

On: January 31, 2025 9:17 AM
Road Accidents
---Advertisement---

Road Accidents l महाराष्ट्रात रस्ते अपघातांची (Road Accidents) संख्या 2023 च्या तुलनेत 2024 मध्ये वाढली असून, एकाच वर्षात अपघातात मृत्यू (Death) झालेल्यांची संख्या 15 हजारांहून अधिक आहे. याचाच अर्थ महाराष्ट्रात रोज 42 अपघाती मृत्यू होत आहेत.

राज्यभरातील रस्ते अपघात आणि मृत्यू :

वर्ष      – अपघात  – मृत्यू
2023  – 35,243  – 15,366
2024  – 36,084  – 15,335

वर्षभरात 841 अपघात वाढले :

नऊ जिल्हे आणि शहरांमध्ये मृत्यूंमध्ये 10 टक्क्यांहून अधिक वाढ झाल्याची नोंद झाली आहे. धुळे जिल्ह्यात (Dhule District) अपघाती मृत्यूंमध्ये सर्वाधिक 25 टक्के वाढ झाली आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरील (Mumbai-Pune Expressway) अपघात 19% वाढले, तर समृद्धी महामार्गावरील (Samruddhi Mahamarg) अपघातांची संख्या 4 टक्क्यांनी घटली आहे, अशी माहिती महामार्ग पोलिसांच्या (Highway Police) आकडेवारीतून समोर आली आहे.

थोडक्यात, महाराष्ट्रात अपघातांचे प्रमाण चिंताजनक असून, त्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरही अपघाती मृत्यूंमध्ये वाढ झाली आहे. यावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.

News Title: 42-Accidental-Deaths-Daily-In-Maharashtra-Road-Accidents-Increased-In-2024-Mumbai-Pune-Expressway-Deaths-Rise

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now