संतोष देशमुखांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यात पोलिसांची मोठी कारवाई, 310 जणांना दणका

On: February 11, 2025 11:55 AM
Beed News
---Advertisement---

Beed News l बीड जिल्ह्यात (Beed District) पोलिसांनी (Police) पाठवलेल्या प्रस्तावानुसार, 127 जणांचे शस्त्र परवाने रद्द किंवा निलंबित (Canceled or Suspended) करण्यात आले आहेत. आतापर्यंत एकूण 310 परवाने रद्द केले आहेत.

दहाजणांनी परवाने स्वतःहून जमा (Surrender) केले आहेत. पोलिसांकडून आणखी प्रस्ताव पाठवले जात असून, हा आकडा 500 च्या घरात जाण्याची शक्यता आहे.

बीडनंतर राज्यभर मोहीम :

बीडमधील शस्त्र परवान्यांचे प्रकरण समोर आल्यानंतर राज्यभरातील माहिती मागवण्यात आली. सर्वच पोलीस अधीक्षक (Police Superintendent), आयुक्त (Commissioner) यांना सूचना करून अनावश्यक परवाने रद्द करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्याप्रमाणे पुण्यासह (Pune) इतर जिल्ह्यांमध्ये शस्त्र परवाने रद्द करण्यात आले होते. सध्या ही मोहीम राज्यभर सुरू आहे.

Beed News  l आतापर्यंतची कारवाई:

जिल्ह्यात 1281 जणांकडे शस्त्र परवाना होता. अविनाश बारगळ (Avinash Bargal) यांनी पोलीस अधीक्षक म्हणून पदभार घेताच, ज्या लोकांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत, अशा 232 जणांची यादी जिल्हाधिकारी अविनाश पाठक (Avinash Pathak) यांच्याकडे पाठविली.

विधानसभा निवडणुकीमुळे (Assembly Election) यावर कारवाई झाली नाही. परंतु, सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी परवाना रद्द, निलंबनाचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे आतापर्यंत 310 शस्त्र परवाने रद्द करण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक नवनीत काँवत (Navneet Kanvat) यांनी आणखी 5 प्रस्ताव पाठविले असून, 19 जणांच्या अर्जावर आक्षेप नोंदवला आहे.

News title : 310 Arms Licenses Revoked in Beed; Action Against 127 Individuals

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now