मोठी बातमी! 26/11चा मास्टरमाइंड तहव्वूर राणा अखेर भारतात

On: April 10, 2025 3:06 PM
Tahawwur Rana
---Advertisement---

Tahawwur Rana | देशात आतापर्यंतच्या सर्वात भीषण दहशतवादी हल्ल्यांपैकी एक असलेल्या 26/11 च्या मुंबई हल्ल्यातील मुख्य मास्टरमाइंड तहव्वूर राणा (Tahawwur Rana) याला अखेर भारतात आणण्यात आलं आहे. विशेष विमानाद्वारे त्याला राजधानी दिल्लीमध्ये उतरवण्यात आलं असून, यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष या कारवाईकडे लागले आहे.

स्पेशल विमानानं राणाचा भारतात प्रवेश

तहव्वूर राणाला घेऊन आलेलं विशेष विमान आज (ता. 10 एप्रिल) भारताच्या (India) एअरस्पेसमध्ये दाखल झालं आणि थेट दिल्लीतील पालम एअरपोर्टवर लँड केलं. त्यानंतर त्याला थेट राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) मुख्यालयात नेण्यात येणार आहे. राणा याच्यावर 26/11 च्या हल्ल्यात सक्रिय सहभाग असल्याचा ठपका आहे आणि त्यासंबंधित अनेक गंभीर आरोपांमुळे तो अनेक वर्षांपासून भारतासाठी ‘मोस्ट वॉन्टेड’ होता.

पालम विमानतळावर त्याच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. चार इनोव्हा, दोन सफारी गाड्यांसह जॅमर यंत्रणा, बॉम्ब शोध पथक आणि इतर सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आल्या होत्या. देशद्रोह आणि दहशतवाद प्रकरणी हे पाऊल सरकारसाठी आणि तपास यंत्रणेसाठी मोठं यश मानलं जात आहे.

एनआयएच्या ताब्यात राणाची चौकशी सुरु होणार

तहव्वूर राणाला पुढील काही तासांत एनआयएच्या मुख्यालयात नेऊन अधिकृत चौकशीस सुरुवात केली जाणार आहे. 26/11 च्या हल्ल्यात त्याची भूमिका किती खोल आहे, त्याच्याशी संबंधित कोणते नवे पुरावे मिळू शकतात, हे यानंतरच स्पष्ट होईल. पाकिस्तानात जन्मलेला तहव्वूर राणा याच्यावर अनेक देशांमध्ये गंभीर आरोप झाले असून त्याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया गेल्या काही वर्षांपासून सुरू होती.

भारत सरकारच्या प्रयत्नांमुळे आणि अमेरिकेशी झालेल्या सामंजस्यामुळे त्याला भारतात आणण्यात अखेर यश आलं आहे. त्याच्या ताब्यात आल्यानंतर आता 26/11 प्रकरणातील काही अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 Title: 26/11 Mastermind Tahawwur Rana in India

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now