‘अर्धा तास पोलीस नव्हते, मरता मरता वाचलो’; महाराष्ट्रातील भाविकांचा थरकाप उडवणारा अनुभव

On: January 30, 2025 4:06 PM
10 Devotees Killed In Prayagraj Mahakumbh Stampede Chaos Negligence Of Administration Maharashtra Devotees Angry
---Advertisement---

Mahakumbh Stampede | उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) प्रयागराजमधील (Prayagraj) महाकुंभ मेळ्यात (Mahakumbh Mela) आज पहाटेच्या सुमारास एक भीषण दुर्घटना (Tragic Incident) घडली. या दुर्घटनेचे फोटो (Photos) आणि व्हिडिओ (Videos) अंगावर काटा आणणारे आहेत. ही घटना इतकी भीषण होती की यात 10 भाविकांचा (Devotees) मृत्यू (Death) झाला तर शेकडो भाविक जखमी (Injured) झाले. (Mahakumbh Stampede)

सर्वत्र आरडाओरड, महिलांच्या किंकाळ्या (Screams) आणि मदतीसाठी टाहो (Cries for Help) ऐकू येत होते. कपडे, चपला आणि इतर साहित्य ठिकठिकाणी अस्ताव्यस्त पडलेले होते.

चेंगराचेंगरीच्या (Stampede) घटनेवेळी प्रशासनाचे (Administration) कुठेही नियंत्रण दिसले नाही. एवढेच नाही तर घटनेनंतर मदतीसाठी याचना करणाऱ्या भाविकांच्या मदतीलाही प्रशासन आले नाही. भाविक उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्यावर संताप व्यक्त करत होते, आक्रोश करत होते.

संगम घाटाजवळील विदारक दृश्य

चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर संगम घाटाजवळ (Sangam Ghat) अतिशय विदारक (Disturbing) दृश्य होते. कित्येक भाविक बेशुद्ध अवस्थेत (Unconscious) जमिनीवर पडलेले होते. ठिकठिकाणी कपडे आणि चपला पडलेल्या होत्या. अनेक भाविकांचे पैसे, मोबाईल (Mobile) हरवले. सगळीकडे एकच गोंधळ (Chaos) माजला होता. काही भाविक मदत करा… मदत करा असे म्हणत होते. तर काहीजण आई-वडील, बहीण-भाऊ, नातलगांपासून दूर झाले होते. कोण कुठे आहे, कुणाचाही पत्ता लागत नव्हता. काही भाविकांना भीतीने रडू कोसळले. इतकी ही भयंकर आणि भीषण घटना असल्याचे त्यातून वाचलेल्या भाविकांनी सांगितले. (Mahakumbh Stampede)

‘अर्धा तास पोलीस नव्हते, मरता मरता वाचलो’; महाराष्ट्रातील भाविकांचा अनुभव

प्रयागराजमध्ये गेलेल्या महाराष्ट्रातील (Maharashtra) काही भाविकांनी आपल्यावर बेतलेली भयंकर घटना सांगितली. त्यांचा हा व्हिडिओ आता व्हायरल (Viral) होत आहे. “चेंगराचेंगरी झाली. पण यावेळी अर्धा तास पोलीस (Police) नव्हते. मरता मरता लोक वाचलेत. आम्ही महाराष्ट्रातून आलोय. आमचे पैसे गेले, कपडे गेले. आता घरी कसे जाऊ? माझ्या आईच्या अंगावरील कपडे गेले. पण मदतीला न आलेले पोलीस नंतर आम्हालाच बोलत होते,” असे महाराष्ट्रातील एका कुटुंबाने (Family) सांगितले.

“दोनशे लोक चेंगराचेंगरीत होते. माझी पत्नी गर्दीत दबली गेली. अशी असते का व्यवस्था?” असा सवाल चेंगराचेंगरीतून वाचलेल्या एका मराठी कुटुंबातील व्यक्तीने केला. “इथे कुठेही प्रशासन नाहीये. मेले तर मेले भाविक, अशी स्थिती आहे,” असा संताप भाविकांनी व्यक्त केला. चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर अनेक लोक आपला मोबाईल, पैसे आणि कपडे अस्ताव्यस्थ पडलेल्या ढिगाऱ्यांमध्ये शोधत होते. (Mahakumbh Stampede)

या दुर्घटनेमुळे महाकुंभ मेळ्यातील सुरक्षा व्यवस्थेवर (Security Arrangements) प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासनाच्या हलगर्जीपणाबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Title : 10 Devotees Killed In Prayagraj Mahakumbh Stampede Chaos Negligence Of Administration Maharashtra Devotees Angry

 

Join WhatsApp Group

Join Now