आज 1 सप्टेंबरपासून बदलले ‘हे’ ७ नवे नियम, थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार?

On: September 1, 2025 5:18 PM
August 1 Rule Changes
---Advertisement---

1 September Rules Changes | सप्टेंबर 2025 पासून काही महत्त्वाचे आर्थिक नियम आणि बदल लागू झाले आहेत, ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खर्चावर होणार आहे. यात ITR भरण्याची अंतिम तारीख, युनिफाइड पेन्शन योजना (UPS), भारतीय डाक विभागाचे बदल, क्रेडिट कार्ड पॉलिसी सुधारणा, बँक FD योजना आणि एलपीजी व इंधन दरांतील बदल यांचा समावेश आहे. चला तर जाणून घेऊया कोणते सात मोठे बदल तुमच्या खिशाला फटका देणार आहेत. (1 September Rules Changes)

कोणते नियम बदलले? :

या वर्षी आयकर विभागाने ITR दाखल करण्याची अंतिम तारीख 30 जुलैवरून वाढवून 15 सप्टेंबर 2025 केली होती. आता ही मुदत संपत आल्याने, करदात्यांनी वेळेत आयटीआर दाखल करणं आवश्यक आहे. अन्यथा दंड आणि नोटिसा मिळण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS) अंतर्गत UPS निवडण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे. याआधी ही अंतिम मुदत 30 जून होती.

1 सप्टेंबरपासून भारतीय डाक विभागाने देशांतर्गत डाक सेवांमध्ये सुधारणा केल्या आहेत. नोंदणीकृत डाक पाठवण्यासाठी आता केवळ स्पीड पोस्टचाच वापर करता येईल. यामुळे पोस्टल सर्व्हिसेस अधिक जलद आणि एकसमान पद्धतीने उपलब्ध होणार आहेत.

1 September Rules Changes | क्रेडिट कार्ड पॉलिसी सुधारणा :

SBI कार्डने आपल्या काही कार्ड्ससाठी नवे नियम लागू केले आहेत. 1 सप्टेंबरपासून डिजिटल गेमिंग आणि सरकारी वेबसाइटवरील व्यवहारांसाठी रिवॉर्ड पॉइंट्स दिले जाणार नाहीत. त्यामुळे ग्राहकांना रिवॉर्ड्स मिळवण्याच्या संधी कमी होणार आहेत.

काही बँकांनी विशेष मुदत ठेवीच्या (FD) योजना जाहीर केल्या आहेत. इंडियन बँकेच्या 444 आणि 555 दिवसांच्या FD योजना, तसेच आयडीबीआय बँकेच्या 444, 555 आणि 700 दिवसांच्या योजना यामध्ये गुंतवणूक करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2025 आहे. (1 September Rules Changes)

तेल कंपन्या दर महिन्याला इंधनाच्या किंमतींमध्ये बदल करतात. ऑगस्टमध्ये 19 किलो व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत 33.50 रुपयांनी कमी होऊन ₹1,631.50 (दिल्ली) इतकी झाली होती. सप्टेंबरमध्ये या दरात पुन्हा बदल होण्याची शक्यता आहे. घरगुती गॅस सिलेंडरची किंमत मात्र 8 एप्रिल 2025 पासून स्थिर आहे.

हे सर्व बदल मिळून नागरिकांच्या दैनंदिन खर्चावर थेट परिणाम करणार आहेत. वेळेवर ITR न भरल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तर क्रेडिट कार्डवरील रिवॉर्ड्स कमी होणार आहेत. त्याचवेळी FD, LPG आणि इंधन दर बदल हे घरगुती बजेटला धक्का देणारे ठरू शकतात.

News Title: September 1 Rules Changes: ITR Deadline, Credit Card Policies, LPG Cylinder Prices – 7 Big Updates Affecting Your Pocket

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now