आणखी एका बड्या बँकेत मोठा घोटाळा, गुंतवणूकदारांची उडाली झोप

On: February 15, 2025 8:53 PM
Bank Scam
---Advertisement---

Bank Scam l रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर (New India Co-operative Bank) कारवाई केल्यानंतर, ठेवीदारांनी बँकेबाहेर रांगा लावून आपल्या ठेवींची चौकशी केली. मात्र, समाधानकारक उत्तर न मिळाल्याने ठेवीदार निराश झाले. अशातच, बँकेसंदर्भात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

माजी महाव्यवस्थापकावर फसवणुकीचा गुन्हा :

बँकेचे माजी जनरल मॅनेजर अँड हेड ऑफ अकाउंट्स हितेश मेहता (Hitesh Mehta) यांच्याविरोधात दादर पोलीस ठाण्यात (Dadar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बँकेच्या तब्बल १२२ कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मुंबई आर्थिक गुन्हे शाखा (Economic Offences Wing) करणार आहे.

Bank Scam l नेमका काय आहे घोटाळा? :

न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या माजी महाव्यवस्थापकाने बँकेच्या तिजोरीतून १२२ कोटी रुपये काढून घेतल्याचे उघडकीस आले आहे. हितेश प्रवीणचंद मेहता असे आरोपीचे नाव असून, ते बँकेच्या महाव्यवस्थापकपदी असताना त्यांच्याकडे दादर आणि गोरेगाव शाखांची जबाबदारी होती. या पदाचा गैरवापर करून दोन्ही शाखांच्या खात्यातून १२२ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

तक्रार आणि तपास :

बँकेच्या मुख्य लेखाधिकाऱ्यांनी दादर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. या घोटाळ्यात हितेश मेहता यांच्यासोबत आणखी एका व्यक्तीचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यानुसार पोलीस तपास करत असून, हे प्रकरण पुढील तपासासाठी EOW कडे वर्ग करण्यात आले आहे.

News Title: ₹122 Crore Fraud at New India Co-operative Bank; Case Against Former General Manager

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now