‘माझ्या जीवाला…’; झिशान सिद्दीकी यांचा मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप

On: January 29, 2025 12:06 PM
Zeeshan Siddique
---Advertisement---

Zeeshan Siddique | राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर तब्बल तीन महिन्यांनी या प्रकरणात चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. मात्र, या चार्जशीटवर नाराजी व्यक्त करत त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकी (Zeeshan Siddique) यांनी मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सांगितले की, हत्येच्या कटात काही बिल्डर्सचा हात असल्याचा संशय असूनही पोलिसांनी त्यांची साधी चौकशीही केलेली नाही.

झिशान सिद्दीकींचा पोलिसांवर आक्रमक सवाल

झिशान सिद्दीकी (Zeeshan Siddique) यांनी पोलिसांवर संशय व्यक्त करत म्हटले की, “मी ज्या बिल्डर्सच्या नावांचा संशय घेतला होता, त्यातील एकाचीही चौकशी पोलिसांनी केलेली नाही.

जर उद्या माझ्यावर किंवा माझ्या कुटुंबावर हल्ला झाला, तर पुन्हा पोलिस हेच बिल्डर्स निर्दोष असल्याचे सांगतील याची मला खात्री आहे.” त्यांनी पोलिसांच्या चौकशीच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाराजी दर्शवली आहे.

“माझ्या जीवाला धोका, सरकारने लक्ष द्यावे”

झिशान सिद्दीकी यांनी पुढे म्हटले की, “गोळीबाराच्या आधी स्मोक बॉम्ब फुटल्याची माहिती आहे, हे भ्याडपणाचे लक्षण आहे. आता माझ्या जीवाला धोका आहे. जर काही घडले, तर मी ज्या बिल्डर्सची नावे घेतली आहेत, तेच जबाबदार असतील.

पोलिस त्यांना निर्दोष सोडतील याची भीती वाटते. मी मुख्यमंत्र्यांकडे (CM) आणि उपमुख्यमंत्र्यांकडे (Ajit Pawar, Devendra Fadnavis, Eknath Shinde) या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करतो.”

झिशान सिद्दीकी (Zeeshan Siddique) यांच्या या वक्तव्यामुळे बाबा सिद्दीकी हत्याकांडाचा तपास आणि पोलिसांची भूमिका यावर नवे प्रश्न निर्माण झाले आहेत. आता मुख्यमंत्री आणि राज्य सरकार या प्रकरणात पुढील कोणते पाऊल उचलतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Title : Zeeshan Siddique Accuses Mumbai Police of Negligence in Baba Siddique Murder Case

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now