आधी अफेर्सच्या चर्चा नंतर व्हिडीओ शेअर, RJ महवश, म्हणाली ‘कहां था ना…’

On: March 10, 2025 6:46 PM
RJ Mahvash
---Advertisement---

Yuzvendra Chahal | दुबईमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात युजवेंद्र चहल मैदानावर नसतानाही तो गुगलवर सर्वाधिक सर्च झालेल्या खेळाडूंपैकी एक ठरला. त्याला स्टेडियममध्ये एका अनोळखी तरुणीसोबत पाहण्यात आले आणि लवकरच तिची ओळख आरजे आणि अभिनेत्री महवश म्हणून उघड झाली. विशेष म्हणजे, चहल सध्या पत्नी धनश्री वर्मासोबत घटस्फोटाच्या प्रक्रियेत आहे.

महवशने शेअर केले खास फोटो-

महवशने रविवारी रात्रीच्या सामन्यातील काही खास क्षण सोशल मीडियावर शेअर केले. भारताच्या विजयाच्या पार्श्वभूमीवर तिने फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले, ज्यामध्ये चहलही दिसतो. मात्र, त्याच्या चेहऱ्याचा स्पष्ट उल्लेख नव्हता. तिने कॅप्शनमध्ये लिहिले, “कहां था ना जिताके आऊंगी, मी टीम इंडियासाठी लकी आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Mahvash (@rj.mahvash)

या पोस्टमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली असून, सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. एका चाहत्याने कमेंट केली, “चहलची (Yuzvendra Chahal) बॉलिंग स्पीड: 85 kmph, पण मूव्ह ऑन स्पीड: 85+.” दुसऱ्याने लिहिले, “चहल भाऊ लाईफ एन्जॉय करत आहेत.” काहींनी धनश्रीचे नाव घेत प्रतिक्रिया दिल्या.

युजवेंद्र आणि धनश्री यांचा घटस्फोट-

चहल आणि धनश्री यांच्या विभक्त होण्याच्या चर्चा त्यावेळी सुरू झाल्या, जेव्हा दोघांनी एकमेकांना इंस्टाग्रामवर अनफॉलो केले. काही काळ उलटल्यानंतर त्यांनी अधिकृतरित्या घटस्फोट घेतल्याचे स्पष्ट झाले.

याविषयी स्पष्टीकरण देताना चहलने (Yuzvendra Chahal) जानेवारीत इंस्टाग्रामवर पोस्ट लिहिली होती. त्याने आपल्या चाहत्यांचे आभार मानले आणि म्हटले, “मी आतापर्यंतच्या प्रवासात माझ्या चाहत्यांच्या प्रेमाशिवाय काहीही मिळवू शकलो नसतो. पण माझा प्रवास अजून संपलेला नाही! मी देशासाठी, संघासाठी आणि चाहत्यांसाठी अद्याप अनेक जबरदस्त ओव्हर्स टाकायचे आहेत.”

त्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्यावरील चर्चांबाबतही भाष्य केले आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले. त्याने लिहिले, “माझ्या कुटुंबासाठी या चर्चा त्रासदायक आहेत. त्यामुळे कोणत्याही अफवांमध्ये अडकू नये.”

दरम्यान, धनश्रीनेही नुकतीच सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत ट्रोल करणाऱ्यांवर निशाणा साधला. तिने लिहिले, “माझ्या चारित्र्यावर होत असलेले हल्ले निराधार आहेत. काहीजण कोणताही तपशील न तपासता माझ्या प्रतिष्ठेची बदनामी करत आहेत.”

News Title : Yuzvendra Chahal spotted with RJ Mahvash

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now