‘या’ खेळाडूमध्ये Yuvraj Singh ला दिसते स्वतःची झलक!

On: January 14, 2024 7:25 PM
Yuvraj Singh
---Advertisement---

Yuvraj Singh | भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू युवराज सिंग (Yuvraj Singh) हा एक उत्कृष्ट फलंदाज आहे. युवीने दीर्घकाळ भारतासाठी मधल्या फळीत धमाकेदार कामगिरी केली. त्याच्या निवृत्तीनंतर टीम इंडियाला युवीसारखा चांगला खेळाडू सापडलेला नाही. पण भारतीय संघाला आता युवराजसारखा आणखी एक खेळाडू मिळाला आहे. ज्याबद्दल युवराज सिंगने (Yuvraj Singh) स्वत:च सांगितलं आहे.

रिंकू सिंगमध्ये Yuvraj ला दिसते स्वतःची झलक

सध्याच्या क्रिकेट संघात असा खेळाडू आहे ज्याच्यात युवराज सिंगला स्वतःची झलक दिसते. तो दुसरा कोणी नसून रिंकू सिंग आहे. नुकत्याच एका कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत त्याने हा खुलासा केला. जेव्हा युवीला विचारण्यात आलं की तुम्ही मधल्या षटकांमध्ये जलद धावा काढता. सध्या रिंकूने ही जबाबदारी घेतली आहे. या युवा फलंदाजाबद्दल तुमचं मत काय आहे? तुम्ही रिंकूला तुमची रिप्लेसमेंट म्हणून पाहत आहात का? यावर युवीने उत्तर दिलं.

Yuvraj Singh नेमकं काय म्हणाला?

जर माझी जागा कोणी घेऊ शकत असेल तर ती फक्त रिंकू सिंग असेल. त्याला कोणत्याही सुधारणेची गरज नाही. तो मधल्या षटकांमध्ये वेगाने धावा करतो आणि गरज पडेल तेव्हा डाव पुढे नेतो. माझ्या मते त्याने तिन्ही फॉरमॅट खेळायला हवं. तो फक्त T20 क्रिकेटपुरता मर्यादित राहू नये, असं युवराज सिंग म्हणालाय.

रिंकू सध्या भारतीय संघातील सर्वोत्तम डावखुरा खेळाडू आहे. तो मला माझी आठवण करून देतो, हल्ला केव्हा करायचा, कधी स्ट्राइक रोटेट करायचा हे त्याला माहीत आहे आणि दबावाखाली तो कमालीचा हुशार आहे, असं म्हणत युवीने रिकूचं कौतुक केलंय.

मला त्याच्यावर दबाव आणायचा नाही, पण मला खरोखर विश्वास आहे की मी फिनिशर होण्यासाठी जे करायचो ते करण्याचं कौशल्य त्याच्याकडे आहे. जो 5 किंवा 6 क्रमांकावर चांगली कामगिरी करतो, असंही युवराज म्हणालाय.

रिंकू सिंगने यंदाच्या आयपीएलसह भारतीय संघासाठी चांगली कामगिरी केली आहे. सर्वप्रथम, आयपीएलमधील त्याच्या झंझावाती कामगिरीमुळे त्याला टीम इंडियात स्थान मिळाले. त्यानंतर टीम इंडियामध्येही त्याने हीच कामगिरी कायम ठेवली.

महत्त्वाच्या बातम्या- 

WhatsApp चं आणखी एक जबदरदस्त फीचर घालणार धुमाकूळ!

iPhone 15 तब्बल 12 हजार रुपयांनी स्वस्त, आता फक्त एवढे रुपये भरा आणि घरी आणा!

Shaun Marsh | क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर; दिग्गज खेळाडूने घेतली निवृत्ती

कार घेणार असाल तर ही बातमी वाचा; Hyundai ने दिली मोठी गुड न्यूज

Shruti Marathe | ‘तू माझ्यासोबत झोपली तर…’; श्रुती मराठेचा अत्यंत धक्कादायक खुलासा

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now