NEET आंदोलनावर युवराज सिंगने दिली रोखठोख प्रतिक्रिया!

On: July 23, 2026 2:11 PM
Yuvraj Singh
---Advertisement---

Yuvraj Singh | नीट पेपरफुटी प्रकरणावरून दिल्ली (Delhi) येथील जंतर-मंतर (Jantar Mantar) येथे सुरू असलेल्या आंदोलनावर भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग (Yuvraj Singh) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येक विद्यार्थी आणि नागरिकाला सुरक्षित वातावरणात शिक्षण घेण्याचा व स्वप्ने पूर्ण करण्याचा अधिकार असल्याचे सांगत त्यांनी संवादातून या प्रश्नावर मार्ग काढण्याचे आवाहन केले आहे.

विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत युवराज सिंगची भूमिका :

कॉकरोच जनता पार्टीच्या (Cockroach Janata Party) नेतृत्वाखाली नीट (NEET) पेपरफुटीविरोधात सुरू झालेले आंदोलन सुरुवातीला शांततेत सुरू होते. मात्र, 20 जुलै 2026 रोजी ‘संसद चलो’ (Sansad Chalo) मोर्चादरम्यान पोलिसांनी आंदोलकांना रोखण्यासाठी लाठीचार्ज आणि अश्रुधुराचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेनंतर आंदोलन अधिक तीव्र झाले असून देशभरातून विविध क्षेत्रातील व्यक्तींनी यावर प्रतिक्रिया व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.

युवराज सिंग (Yuvraj Singh) यांनी आपल्या इन्स्टाग्राम (Instagram) स्टोरीद्वारे या प्रकरणावर मत व्यक्त केले. त्यांनी म्हटले की, प्रत्येक मुलगा, मुलगी, विद्यार्थी, महिला आणि पुरुष यांना शांततेत शिक्षण घेण्याची, सुरक्षित वातावरणात वाढण्याची आणि स्वतःची स्वप्ने पूर्ण करण्याची समान संधी मिळायला हवी. नागरिकांचे कल्याण हाच देशाच्या प्रगतीचा मजबूत पाया असल्याचे नमूद करत त्यांनी काळजी, संधी आणि आशा यांवर आधारित समाज उभारण्यासाठी सर्वांनी एकत्र काम करण्याचे आवाहन केले. भारताच्या भविष्यासाठी संवादातून सामंजस्यपूर्ण तोडगा काढणे आवश्यक असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

Yuvraj Singh | संसदेतही पेपरफुटीवरून संघर्ष कायम :

20 जुलै रोजी कॉकरोच जनता पार्टीने (Cockroach Janata Party) दिल्ली येथे ‘संसद चलो’ (Sansad Chalo) मोर्चा आयोजित केला होता. आंदोलकांना संसदेकडे जाण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांनी कारवाई केल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. लाठीचार्ज आणि अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर झाल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून या घटनेवरून राजकीय वातावरणही तापले आहे.

नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणावरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी संसदेत लावून धरली आहे. या मुद्द्यावरून सरकार आणि विरोधी पक्षांमध्ये तीव्र वाद सुरू असून विशेष नियमांखाली चर्चा करण्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. सरकार चर्चेसाठी तयार असल्याचे सांगत असले तरी लोकसभा (Lok Sabha) आणि राज्यसभा (Rajya Sabha) या दोन्ही सभागृहांचे कामकाज अनेकदा स्थगित करावे लागले आहे.

News Title: Yuvraj Singh Reacts to NEET Protest

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now