तरुणांनो तयारीला लागा! महाराष्ट्रात 8,100 पोलिस पदांसाठी भरती होणार?

On: September 15, 2026 4:31 PM
Police Recruitment
---Advertisement---

Police Recruitment | महाराष्ट्र पोलिस दलात (Maharashtra Police) सहभागी होण्याची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. राज्यातील जून 2027 पर्यंत रिक्त होणाऱ्या सुमारे 8,100 पोलीस अंमलदारांच्या जागा भरण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. गृह मंत्रालयाने यासंदर्भात आवश्यक माहिती मागवली असून, 2027 मध्ये भरतीची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

2027 मध्ये पुन्हा मोठी पोलीस भरती :

महाराष्ट्रातील तरुणांसाठी पोलीस भरतीची तयारी करण्याची आणखी एक संधी निर्माण होत आहे. राज्याच्या गृह मंत्रालयाकडून (Home Ministry) जून 2027 पर्यंत रिक्त होणाऱ्या पोलीस अंमलदारांच्या पदांचा तपशील मागवण्यात आला आहे. त्यामुळे उपलब्ध होणाऱ्या रिक्त जागांचा आढावा घेऊन पुढील भरतीची प्रक्रिया आखली जाणार असल्याचे समोर येत आहे. या प्रक्रियेमुळे राज्यातील मोठ्या संख्येने इच्छुक उमेदवारांना पोलीस दलात प्रवेश करण्याची संधी मिळू शकते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या मार्गदर्शनाखाली मागील दोन वर्षांपासून राज्यात नियमितपणे मोठ्या प्रमाणावर पोलीस भरती करण्यात येत आहे. याच भरती प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर 2027 मध्येही मोठी भरती होण्याची शक्यता आहे. चालू वर्षात तब्बल 15,631 पोलिसांची भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी भरतीचा विचार करता उमेदवारांनी मैदानी चाचणी तसेच लेखी परीक्षेच्या तयारीवर आतापासूनच भर देण्याचे आवाहन केले जात आहे.

Police Recruitment | अर्ज आणि भरती प्रक्रियेचे संभाव्य वेळापत्रक :

जून 2027 पर्यंत रिक्त होणाऱ्या अंदाजे 8,100 पदांचा विचार करून पुढील पोलीस भरती केली जाण्याची शक्यता आहे. यापूर्वी निवड झालेल्या उमेदवारांच्या प्रशिक्षणाला जून महिन्यापासून सुरुवात करण्यात आली आहे. उर्वरित निवड झालेल्या उमेदवारांचे प्रशिक्षण फेब्रुवारी 2027 मध्ये सुरू होणार आहे. त्यामुळे नवीन भरतीच्या प्रत्यक्ष प्रक्रियेला जानेवारी 2027 पासून सुरुवात करण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. याबाबतची अधिकृत माहिती लवकरच जाहीर होण्याची अपेक्षा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 8,100 रिक्त पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2026 या कालावधीत अर्ज करण्याची संधी मिळू शकते. त्यानंतर 1 जानेवारी 2027 ते 31 मार्च 2027 या कालावधीत भरतीची प्रत्यक्ष प्रक्रिया राबवली जाण्याची शक्यता आहे. मात्र, या तारखांबाबत अंतिम निर्णय आणि अधिकृत घोषणा संबंधित यंत्रणेकडून केली जाणार आहे. त्यामुळे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांनी संभाव्य वेळापत्रक लक्षात घेऊन मैदानी सराव, लेखी परीक्षेचा अभ्यास आणि नियोजन आतापासून सुरू ठेवणे महत्त्वाचे ठरणार आहे.

News title : Maharashtra Police Recruitment 2027: 8,100 Posts

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now