चहापानासाठी ‘इतक्या’ लाखांचा खर्च, आकडा वाचून थक्क व्हाल

On: October 22, 2023 10:43 AM
---Advertisement---

मुंबई | विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर ते 20 डिसेंबर दरम्यान दहा दिवसाच्या कामकाजाची तात्पुरती दिनदर्शिका जाहीर करण्यात आली आहे. नागपूर येथे हे अधिवेशन होणार आहे. यंदा सत्ताधाऱ्यांनी विरोधकांसाठी ‘थ्री स्टार’ चहापानाची व्यवस्था करण्याचं ठरवलं आहे. त्यासाठी 20 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचं कळतंय.

‘तीन आणि त्यापेक्षा अधिक स्टार,’ असलेल्या हॉटेलकडून त्यांनी चहापानासाठीचे दर मागवले आहेत. या कार्यक्रमासाठी प्रशासनाला 20 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

या कामात हॉटेल त्यापेक्षा जास्त अथवा त्यापेक्षा कमी किंमत नोंदवू शकतात. ज्या हॉटेलने कमी किंमत सां गितली असेल, त्याला हे काम मिळणार असल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे.

चहापानासाठी 20 लाख रुपये हा आकडा डोळे फिरवणारा आहे. हा खर्च केवळ विरोधकांसाठीच्या चहापानापुरता मर्यादित नाही. अधिवेशनाच्या दरम्यान प्रशासन किमान पाच वेळा चहापान करणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now