Sharad Pawar | ‘शरद पवारांनी राजकारणापासून दूर जावं’; वाढदिवशी कोणी दिला सल्ला?

On: December 12, 2023 7:42 PM
Sharad Pawar
---Advertisement---

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचा (Sharad Pawar) आज 83 वा वाढदिवस आहे. आज ते नागपूरात होते. नागपुरात ते ज्येष्ठ साहित्यिक यशवंत मनोहरांकडे गेले होते. यावेळी त्यांनी शरद पवारांचं कौतुक केलं. भविष्यात राष्ट्रवादी पक्ष उरला नाही, तरी ते महान आहेत, असं म्हणत त्यांनी शरद पवारांचं कौतुक केलं आहे.

“शरद पवारांनी राजकारणापासून दूर जावं”

शरद पवार (Sharad Pawar) यांनी महाराष्ट्राच्या स्थानिक राजकारणापासून दूर जावं, असा सल्ला ज्येष्ठ साहित्यिक यशवंत मनोहर यांनी शरद पवारांना दिला आहे.

शरद पवारांच्या पक्षात आणि कुटुंबात जे काही सध्या सुरू आहे. त्या प्रश्नांना बाजूला सारून फक्त राष्ट्रीय पातळीवरील राजकारणात भाजपला हरवण्यासाठी बहुजनांना एकत्रित आणण्यावर लक्ष केंद्रित कराव, असं मनोहरांनी म्हटलंय.

देशभरातील बहुतांशी बहुजनांना त्यांच्याबद्दल आदर आहे त्यांच्यावर विश्वास आहे. देशातील बहुतांशी पक्षही त्यांच्या क्षमतेवर विश्वास ठेवतात. त्यामुळे शरद पवार यांनी इंडिया आघाडीला मजबूत करावं, असं यशवंत मनोहर म्हणाले.

Sharad Pawar वाढदिवस साजरा करणार नाहीत

आज विविध स्तरातून शरद पवार यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मात्र अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान, मराठा आरक्षणासारख्या प्रश्नांमुळे शरद पवार यंदा वाढदिवस साजरा करणार नाहीत.

दरम्यान, शरद पवार 83 वर्षांचे झाले आहेत. परंतु त्यांचा उत्साह आणि काम करण्याची पद्धत तरुणांना लाजवणारी आहे. त्यांचे वय वाढले असले तरी मन तरुण आहे. आजही पायाला भिंगरी लावल्यासारखे ते राज्यात दौरे करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

Rajasthan CM | भाजपचा आणखी एक झटका; राजस्थानमधून मोठी बातमी समोर

Manoj Jarange | जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती समोर!

Rashmika Mandanna | नॅशनल क्रश रश्मिकाचा नवा व्हिडीओ व्हायरल

Neena Gupta | ‘माझा एक्स बॉयफ्रेंड फुकटा होता, तो माझ्याकडे…’; नीना गुप्तांचा खुलासा

BMC | शिंदे सरकारची मोठी खेळी; ठाकरे कुटुंब अडचणीत येणार?

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now