सामन्यादरम्यान चाहत्याचा मैदानात शिरकाव; स्टार्कच्या पत्नीनं शिकवला चांगलाच धडा

On: February 29, 2024 7:29 AM
WPL 2024
---Advertisement---

WPL 2024 | सध्या महिला प्रीमिअर लीगचा थरार रंगला आहे. बंगळुरू येथे सुरूवातीचे सामने खेळवले जात आहेत. महिला प्रीमिअर लीग 2024 चा पहिला टप्पा बंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जात आहे. लीगमधील सहावा सामना मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स यांच्यात झाला. या सामन्यादरम्यान एक चाहता मैदानात आला. यामुळे काही काळ खेळ थांबवावा लागला. मुंबईकडून फलंदाजी करताना वृंदा दिनेशला दुखापत झाली होती. अशा स्थितीत यूपीने किरण नवगिरेला सलामीसाठी मैदानात उतरवले.

किरण नवगिरेने अवघ्या 25 चेंडूत मोसमातील सर्वात वेगवान अर्धशतक ठोकले. खरं तर यूपीच्या संघाने 162 धावांचे लक्ष्य 17 व्या षटकात पूर्ण केले आणि पहिला विजय साकारला. या हंगामातील मुंबईला आपल्या पहिल्या पराभवाचा सामना करावा लागला. हरमनप्रीत कौरच्या अनुपस्थितीत मुंबईचा संघ बुधवारी मैदानात होता. यूपी वॉरियर्सच्या संघाची धुरा ऑस्ट्रेलियाच्या पुरूष संघाचा खेळाडू मिचेल स्टार्कची पत्नी ॲलिसा हिलीवर आहे.

चाहत्याचा मैदानात शिरकाव

दरम्यान, मुंबई आणि यूपी यांच्यातील सामन्यादरम्यान एक नाट्यमय घडामोड घडली. मुंबई इंडियन्सच्या डावात एक चेंडू शिल्लक असताना एक चाहता मैदानात आला. तो खेळपट्टीच्या दिशेने जात होता पण यूपी वॉरियर्सची कर्णधार ॲलिसा हिलीने त्याला रोखले. हिलीमुळेच खेळपट्टी खराब होण्यापासून वाचली.

सुरक्षा रक्षकांनी लगेच मैदानात येऊन उत्साही चाहत्याला पकडले. त्याला पकडून मैदानाबाहेर नेले. त्या चाहत्याच्या हातात आरसीबीची जर्सी होती. यूपी वॉरियर्सने महिला आयपीएल 2024 मध्ये पहिला विजय मिळवला आहे. या सामन्यात यूपीने मुंबईचा 7 विकेट राखून पराभव केला. सलग दोन विजयानंतर मुंबईला पहिला पराभव पत्करावा लागला आहे.

 

WPL 2024 चा थरार

यूपी वॉरियर्सने मुंबई इंडियन्सचा 7 विकेट राखून पराभव करून पहिला विजय मिळवला. यूपीकडून सलामीवीर किरण नवगिरेने 31 चेंडूत 57 धावांची नाबाद खेळी केली. ती सामनावीर ठरली. नवगिरेने सलग दोन षटकार ठोकत आपले अर्धशतक पूर्ण केले. गतविजेत्या मुंबईला यंदाच्या हंगामातील पहिला पराभव पत्करावा लागला.

दरम्यान, मुंबई इंडियन्सची नियमित कर्णधार हरमनप्रीत कौर दुखापतीमुळे यूपीविरूद्धच्या सामन्याला मुकली. यूपी वॉरियर्सकडून किरण नवगिरेने स्फोटक खेळी करून संघाला विजय मिळवून दिला.

News Title- Mitchell Starc’s wife Alyssa Healy blocks a fan as he enters the field during the mi vs up match at WPL 2024
महत्त्वाच्या बातम्या –

सर्वोच्च न्यायालयाचा एक निर्णय अन् बाबा रामदेव यांचे 2300 कोटींचे नुकसान!

झारखंड! रेल्वेचा भीषण अपघात; 12 जणांचा मृत्यू, भागलपूर-यशवंतपूर एक्स्प्रेसची धडक

तापसी पन्नू लग्न करणार असल्याची चर्चा; अभिनेत्रीचं सूचक विधान, म्हणाली…

BCCI ची कारवाई! इशान आणि श्रेयसचा ‘पगार’ बंद; जय शाहंनी दिला होता इशारा

BCCI चा वार्षिक करार! किशन-अय्यरला वगळलं; विराट-रोहितसह दोघांना मिळणार 7 कोटी

Join WhatsApp Group

Join Now