Pune to Goa Train | गोवा हे देशातील आणि जगातील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रातून, विशेषतः मुंबई आणि पुण्यातून मोठ्या प्रमाणात पर्यटक गोव्याला भेट देत असतात. सध्या पुण्याहून गोव्याला रेल्वेने प्रवास करायचा झाल्यास प्रवाशांना जवळपास दहा तासांचा वेळ लागतो. पुणे ते गोवा हे सुमारे 460 किलोमीटर अंतर असल्याने हा प्रवास वेळखाऊ ठरतो. मात्र, आता याच प्रवासाबाबत एक आश्चर्यकारक बातमी समोर आली असून सोशल मीडियावर ती प्रचंड व्हायरल होत आहे.
जर तुम्हाला कुणी सांगितले की पुण्याहून गोव्याला आणि गोव्यातून पुण्याला केवळ एका तासात रेल्वेने जाता येईल, तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण जगात अशी एक सुपरफास्ट ट्रेन अस्तित्वात आहे, ज्यामुळे हा प्रवास प्रत्यक्षात शक्य होऊ शकतो. अलीकडेच या जगातील सर्वाधिक वेगवान ट्रेनची चाचणी यशस्वीरीत्या घेण्यात आली असून तिच्या वेगामुळे संपूर्ण जगाचे लक्ष वेधले गेले आहे.
ताशी 700 किमी वेगाने धावणारी जगातील सर्वात वेगवान ट्रेन :
जगातील सर्वाधिक वेगवान ट्रेन तब्बल ताशी 700 किलोमीटर वेगाने धावू शकते. विशेष बाब म्हणजे ही ट्रेन अवघ्या दोन सेकंदांत हा वेग पकडते. हा वेग अनेक प्रवासी विमानांपेक्षाही अधिक असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे भविष्यात लांब पल्ल्याचा प्रवास केवळ काही मिनिटांत पूर्ण होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. (Pune to Goa Train News)
ही ट्रेन पारंपरिक रेल्वेसारखी चाकांवर धावत नाही, तर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने हवेत तरंगत धावते. त्यामुळे घर्षण जवळपास शून्य होते आणि गाडीला प्रचंड वेग मिळतो. याच कारणामुळे या ट्रेनकडे भविष्यातील वाहतुकीचे माध्यम म्हणून पाहिले जात आहे.
Pune to Goa Train | चीनमध्ये सुरू आहे मॅगलेव्ह ट्रेनची चाचणी :
जगातील सर्वाधिक वेगवान या ट्रेनची चाचणी चीनमध्ये सुरू आहे. चीनने चुंबकीय उत्सर्जन म्हणजेच मॅगलेव्ह तंत्रज्ञानात नवा टप्पा गाठला आहे. मॅगलेव्ह म्हणजे मॅग्नेटिक लेव्हिटेशन ट्रेन, जी विशेष ट्रॅकवर रुळाला न लागता काही सेंटीमीटर हवेत तरंगत धावते. या तंत्रज्ञानामुळे ट्रेन अतिशय वेगाने आणि सुरक्षितपणे धावू शकते. (Maglev Train China)
चीनमधील राष्ट्रीय संरक्षण तंत्रज्ञान विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी या मॅगलेव्ह ट्रेनची चाचणी केली आहे. चाचणीदरम्यान सुमारे 1 टन वजनाच्या वाहनाला 400 मीटर लांबीच्या ट्रॅकवर ताशी 700 किलोमीटर वेगाने चालवण्यात आले. हे अंतर ट्रेनने फक्त दोन सेकंदांत (High Speed Rail) पूर्ण केले आणि नंतर ती सुरक्षितरीत्या थांबवण्यात आली. सध्या ही ट्रेन प्रवासी वाहतुकीसाठी नसून संशोधनासाठी वापरण्यात येत आहे. मात्र भविष्यात जर ही प्रणाली प्रवासी किंवा मालवाहतुकीसाठी वापरात आली, तर पुणे-गोवा सारखा प्रवास अवघ्या 60 मिनिटांत पूर्ण होणे काहीच आश्चर्यकारक ठरणार नाही.






