लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज; ‘या’ तारखेला मिळणार सवलतीत घर

On: January 31, 2025 9:26 AM
Flat Booking
---Advertisement---

Flat Booking l ‘एमसीएचआय क्रेडाई’ (MCHI-CREDAI) ठाणे यांच्यावतीने आयोजित करण्यात येत असलेल्या मालमत्ता प्रदर्शनात (Property Exhibition) ज्या महिला (Women) चार दिवसांत फ्लॅट बुकिंगची (Flat Booking) 20 टक्के रक्कम भरतील, त्या बहिणींना फ्लॅट खरेदीत सवलत (Discount) दिली जाणार असल्याची माहिती अध्यक्ष जितेंद्र मेहता (Jitendra Mehta) यांनी गुरुवारी दिली.

यंदाच्या प्रदर्शनात 100 हून अधिक गृहप्रकल्पांतील (Housing Projects) घरे विक्रीसाठी उपलब्ध असणार असून, यामध्ये 30 लाखांपासून ते तीन कोटींच्या किमतीची घरे उपलब्ध आहेत. पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष राहुल वोरा, सचिन मिराणी, पदाधिकारी गौरव शर्मा, जय वोरा उपस्थित होते.

यंदाचे प्रदर्शन 7 ते 10 फेब्रुवारीदरम्यान :

यंदाचे प्रदर्शन 7 ते 10 फेब्रुवारी या कालावधीत ढोकाळी (Dhokali) येथील हायलँड गार्डन (Highland Garden) मैदानावर भरविण्यात येणार आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन (Inauguration) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते होणार आहे. प्रदर्शनामुळे एकाच छताखाली ठाणे शहर आणि जिल्ह्यातील उत्तमोत्तम गृहप्रकल्पात घर घेण्याची संधी ग्राहकांना उपलब्ध होईल. प्रदर्शनात मोफत प्रवेश (Free Entry) दिला जाणार आहे.

Flat Booking l प्रदर्शनात काय काय असणार? :

– सकाळी 11 ते सायंकाळी 7 पर्यंत प्रदर्शन खुले राहणार आहे.
– ठाणे पूर्व रेल्वे स्टेशनबाहेरील आनंद चित्रपटगृहापासून मोफत बससेवा (Free Bus Service).
– पूर्वनोंदणी (Pre-registration) केल्यास रांगेविना प्रवेश.
– मोफत पार्किंग (Free Parking).
– वॉलेट पार्किंगचाही (Wallet Parking) पर्याय.
– 80 हून अधिक नामांकित बिल्डरांचे (Reputed Builders) 100 हून अधिक गृहप्रकल्पांचे स्टॉल (Stalls).
– 15 हून अधिक वित्तसंस्था (Financial Institutions).
– 25 हजारांहून अधिक घर खरेदीदारांची उपस्थिती.
– वातानुकूलित (Air Conditioned) प्रशस्त मंडप.
– प्रदर्शनात 375 चौरस फुटांची छोटी, त्याहून मोठ्या आकाराची घरे उपलब्ध असतील.
– 30 लाखांपासून तीन कोटींच्या घरांचे पर्याय उपलब्ध असतील.

कशेळी-काल्हेर (Kasheli-Kalher) भागातील काही घरेही प्रदर्शनात विक्रीसाठी असतील, असेही मेहता म्हणाले. गृहसंकुलांसाठी स्पर्धा (Competition) ठेवली जाणार असून त्यातील विजेत्यांना (Winners) दीड लाखांपासून ते 75 हजारांची बक्षिसे (Prizes) दिली जाणार आहेत.

थोडक्यात, MCHI-CREDAI ठाणे यांच्यावतीने आयोजित करण्यात येणाऱ्या मालमत्ता प्रदर्शनात महिलांना घर खरेदीवर विशेष सवलत दिली जाणार आहे. हे प्रदर्शन 7 ते 10 फेब्रुवारीदरम्यान होणार असून, त्यात अनेक नामांकित बिल्डर्स आणि वित्तसंस्था सहभागी होणार आहेत.

News Title: Women-To-Get-Discount-On-Flats-In-MCHI-CREDAI-Thane-Property-Exhibition-Know-Details

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now