‘स्त्रिया केवळ सेक्ससाठी नसतात’

On: October 27, 2023 3:35 PM
---Advertisement---

मुंबई | अभिनेत्री कंगना रनौतने (Kangana Ranaut) दिल्लीतल्या लाल किल्ल्याजवळ असलेल्या मैदानात लव-कुश रामलीलामध्ये रावणाच्या पुतळ्याचं दहन केलं होतं. यानंतर अनेक लोकांनी तिला ट्रोल केलं.

यंदा कंगनाच्या हातून रावण दहन करण्यात आलं होतं. त्यावर अनेक जणांचा आक्षेप होता. त्यामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांचा देखील समावेश होता. कंगना सोशल मिडीयावर कायम ट्रोल होत असते. दरम्यान एका पोस्टमध्ये कंगना पांढऱ्या बिकिनीमध्ये दिसली. यासोबत त्यावर युजरने लिहिलं होतं, ‘ही कंगना रनौतच आहे का? बॉलिवूडची एकमात्र महिला जिला मोदी सरकारकडून एंटरटेन केलं जातं?’

हीच पोस्ट सुब्रमण्यम स्वामी यांनी शेअर करत त्यावर टिका केली. रामलीलाच्या अंतिम दिवशी कंगना रनौतला प्रमुख पाहुणी बनवणं हे मर्यादा पुरुषोत्तम राम यांच्यासाठी अशोभनीय आहे’, असं त्यांनी लिहिलं होतं. त्यावर कंगनाने प्रत्यत्तर दिलं.

खोलवर रुजलेला सेक्सिज्म आणि स्त्री शरीराबद्दलची सुप्त लालसा या गोष्टी तुम्हाला विकृत बनवत आहेत. स्त्रिया केवळ सेक्ससाठी नसतात, त्यांच्याकडे मेंदू, हृदय, हात, पाय असे इतरही अवयव असतात जे पुरुषांकडेही असतात किंवा जे एक महान नेता होण्यासाठी आवश्यक असतं. मग मी रावण दहन का करू नये?, असं कंगणा म्हणाली.

थोडक्यात बातम्या-

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now