विमानतळावर महिलेचा नंगानाच पाहून प्रवाशी हादरले, पाहा व्हायरल व्हिडीओ!

On: March 27, 2025 3:48 PM
Samantha Palma
---Advertisement---

Women Viral Video |सामंथा पाल्मा (Samantha Palma) या महिलेने विमानतळावर अचानक वेडेवाकडे वागण्यास सुरुवात करत उपस्थितांना हादरवून टाकले. TMZ च्या रिपोर्टनुसार, तिला मॅनिक एपीसोड आला होता आणि त्यातच तिने कमीतकमी दोन लोकांना पेन्सिलने इजा केली. व्यवस्थापकाने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिने त्याच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावरच त्याच्या स्वतःच्या पेन्सिलने वार केले आणि त्याच्या मनगटावर चावा घेतला.

या घटनेचा व्हिडिओही समोर आला असून त्यात ती विमानतळावर धिंगाणा घालताना दिसते. तिने एका प्लाझ्मा स्क्रीनची तोडफोड केली, काही लोकांवर पाणी फेकले आणि अगदी नग्न अवस्थेत विमानतळावर इकडून तिकडे धावताना पाहायला मिळाली.

हॉलीवूड फॅंटसीत हरवलेली महिला-

एका प्रवाशाने तिच्या नग्न अवस्थेवर दया येऊन तिला एक कोट देण्याचा प्रयत्न केला, परंतु तिने त्या प्रवाशालाही शिवीगाळ केली. अखेर पोलिसांनी तिला टर्मिनल डीमधील गेट D1 जवळील एका इमर्जन्सी दरवाजामागे लपलेली असताना पकडले. तिच्या शरीरावर इतरांच्या रक्ताचे डाग असल्याचेही सांगण्यात आले.

पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आणि हातकड्या घालून नेले. TMZ च्या माहितीनुसार, पोलिसांशी बोलताना तिने सांगितले की तिला “फुलांबरोबर राहायचं आहे” आणि ती “एका जंगलात” आहे. तिने स्वतःला डिस्नीच्या अ‍ॅरियल, पोकोहोंटस अशा अनेक राजकन्यांची ओळख दिली आणि एकवेळ तिने स्वतःला “व्हीनस” म्हणूनही संबोधले.

घटनेच्या वेळी ती आपल्या आठ वर्षांच्या मुलीसोबत प्रवास करत होती. पोलिसांनी तिच्यावर प्राणघातक शस्त्राने गंभीर हल्ला केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. तिने पोलीस चौकशीत कबुली दिली की त्या दिवशी तीने आपली मानसिक आजाराची औषधं घेतली नव्हती.

Title: Woman Runs Naked, Attacks at Airport

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now