Woman Mental Health Tips l महिलांनी आताच व्हा सावध, ही लक्षणं असतील तर तुमची मानसिक स्थिती नाही बरोबर!

On: January 16, 2024 9:45 AM
Woman Mental Health Tips
---Advertisement---

Woman Mental Health Tips l आजकाल धकाधकीच्या जीवनात आपण आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. मात्र हे शरीरासाठी त्रासदायक आहे. कारण निरोगी आयुष्यासाठी शरीरासोबतच मनही निरोगी असणं खूप फार महत्वाचं मानलं जात. अशातच आरोग्याकडे सर्वात जास्त दुर्लक्ष महिलांचं (Woman Mental Health Tips) होत असल्याचं उघडकीस आलं आहे. आजकाल महिला ऑफिसच काम सांभाळून घर देखील सांभाळत असते. अशावेळी महिलांना अनेकदा मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते.

मात्र महिलांसाठी ही बाब त्रासदायक आहे. कारण महिलांच मानसिक आरोग्य चांगलं असणं गरजेचं असतं. तसेच मानसिक समस्यांच्या परिणामामुळे शरीरात बदल देखील होत असतात. यामुळे भविष्यात गंभीर समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे महिलांमध्ये मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या काय आहेत व त्याची लक्षणे काय आहेत हे जाणून घेऊयात…

Woman Mental Health Tips l महिलांमध्ये मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांची मुख्य कारणे पुढीलप्रमाणे :

बॉयोलॉजिकल कारण : संशोधनातून असे दिसून येत आहे की, स्त्रियांचा मेंदू पुरुषांपेक्षा वेगळा असतो. स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त भावनिक असतात, त्यामुळे त्या सहज नैराश्याच्या बळी पडतात. मात्र याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो.

सामाजिक दबाव : पुरुषांपेक्षा महिलांवर अधिक सामाजिक दबाव असतो. स्त्रीयांवर मुलांची, कुटुंबाची व ऑफिसची जबाबदारी असते. त्यामुळे या सर्व गोष्टींची काळजी घेताना स्त्रीवर प्रेशर असतो. या दबावामुळे महिला मानसिकदृष्ट्या आजारी देखील (Woman Mental Health Tips) पडण्याच्या शक्यत्या असतात.

अनुभव : आजकाल महिलांवर होणारे अत्याचार हे देखील मानसिक आरोग्याचे कारण मानले जाते. कारण महिलांवर अनेकदा शारीरिक, लैंगिक आणि भावनिक अत्याचार केले जातात. मात्र याचा परिणाम त्यांच्या आरोग्यवर होत असतो.

स्त्रियांमध्ये होणाऱ्या मानसिक आजाराची लक्षणे पुढीलप्रमाणे (Woman Mental Health Tips) :

नियमित निराशा : जर एखाद्या स्त्रीला बऱ्याच काळापासून दुःख किंवा निराशा वाटत असेल तर ही मानसिक आरोग्य समस्यांची लक्षणे आहेत. अनेकदा स्त्रिया आपल्या भावना लपवतात आणि हे भविष्यात त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात.

उपक्रमांपासून दूर राहणे : दैनंदिन कामाच्या व्यापातून महिला कामाव्यतिरिक्त इतर ऍक्टिव्हिटी करण्यास टाळाटाळ करतात. मात्र आठ दिवसातून एकदा का होईना महिलांची (Woman Mental Health Tips) वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये सहभाग नोंदवला पाहिजे, यामुळे महिलांचा मूड देखील फ्रेश होतो.

झोपेची वेळ निश्चित नसणे : सततच्या कामातून वेळ मिळत नसल्याने याचा परिणाम आरोग्यावर होत असतो. अशावेळी झोप फार गरजेची असते. त्यामुळे महिलांनी झोपेची वेळ निश्चित करावी.

महत्त्वाच्या बातम्या –

ऐकावं ते नवलच! आता Toilet करताना सुद्धा वाटणार नाही एकटं, मारता येणार गप्पा!

Reliance, TCS सह ‘या’ 5 शेअर्सची छप्परफाड कमाई, एका आठवड्यात कमावले तब्बल 2 लाख कोटी!

Inflation l अबब! 400 रुपयांमध्ये मिळतायेत फक्त 12 अंडी, अन् 250 रुपये किलो झाला कांदा

Eye Care Tips lअशी घ्या डोळ्यांची काळजी, चाळीशीनंतरही लागणार नाही चष्मा!

Stock Market रेकॅार्डब्रेक उंचीवर पोहोचलं, या 5 स्टॅाक्सनी दिले बक्कळ रिर्टन्स!

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now