टाटा पंचला टक्कर देण्यासाठी बाजारात आली ‘ही’ इलेक्ट्रिक कार लाँच!

On: September 12, 2024 2:39 PM
Windsor EV
---Advertisement---

Windsor EV l इलेक्ट्रिक कार मार्केटमध्ये टाटा पंच हे एक लोकप्रिय वाहन बनले आहे. या कारला टक्कर देण्यासाठी एमजी मोटर्सने भारतीय बाजारपेठेत नवीन Windsor EV लाँच केली आहे. ही नवीन इलेक्ट्रिक कार जबरदस्त किमतींसह बाजारात लाँच झाली आहे.

कोणती इलेक्ट्रिक कार मोठी आहे? :

MG Windsor ही इलेकट्रीक कार 9.99 लाख रुपयांच्या किंमतीसह बाजारात लॉन्च करण्यात आली आहे. कंपनीने या इलेक्ट्रिक कारमध्ये बॅटरीची किंमत स्वतंत्रपणे समाविष्ट केली आहे. या कारमध्ये लावलेली बॅटरी 3.5 रुपये प्रति किलोमीटर दराने वापरता येणार आहे. तसेच Punch EV आणि Windsor EV या दोन्ही इलेक्ट्रिक कारची काही खास वैशिष्ट्ये आहेत ते जाणून घेऊया…

विंडसर ईव्ही टाटा पंच ईव्हीपेक्षा मोठी आहे. Windsor EV ची लांबी 4295mm आणि रुंदी 2126mm आहे. तर पंच ईव्हीची लांबी 3857 मिमी आणि रुंदी 1742 मिमी आहे. दोन्ही इलेक्ट्रिक कारमध्ये स्पोर्ट एरो एफिशियंट व्हील आहेत. विंडसरला क्रॉसओवर एसयूव्ही म्हणता येईल. तर पंच ईव्ही ही मिनी एसयूव्हीसारखी आहे.

भारतात उपलब्ध असलेल्या दोन्ही इलेक्ट्रिक कार उत्तम फीचर्सनी सुसज्ज आहेत. Windsor EV मध्ये हवेशीर सीटसह ड्रायव्हर सीट देखील आहे. या वाहनात 15.6-इंचाचा मोठा टचस्क्रीन आहे. या कारमध्ये डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, 360-डिग्री कॅमेरा, 9-स्पीकर ऑडिओ सिस्टम आणि फिक्स्ड ग्लास पॅनोरमिक सनरूफ ही वैशिष्ट्ये आहेत.

Windsor EV l कोणती इलेक्ट्रिक कार चांगली रेंज देईल? :

MG Windsor EV मध्ये प्रिझमॅटिक सेलसह 38kWh LFP बॅटरी पॅक आहे. या EV मध्ये स्थापित केलेली सिंगल मोटर 136 hp ची शक्ती प्रदान करते आणि 200 Nm टॉर्क जनरेट करते. तर Windsor EV सिंगल चार्जिंगमध्ये 330 किलोमीटरची रेंज देण्याचा दावा करते

पंच EV भारतीय बाजारपेठेत दोन बॅटरी पॅकसह उपलब्ध आहे. या वाहनात बसवलेला 25kWh बॅटरी पॅक 315 किलोमीटरची रेंज देत आहे. तर पंच EV 35kWh बॅटरी पॅकसह एका चार्जिंगमध्ये 421 किलोमीटर अंतर कापण्याचा दावा करते.

सध्या Tata Punch EV ची किंमत 9.99 लाख रुपयांपासून 13.7 लाख रुपयांपर्यंत सुरू आहे. तर Windsor EV ची एक्स-शोरूम किंमत 9.99 लाख रुपयांपासून सुरू होते. पण जर या कारच्या बॅटरीची किंमत देखील समाविष्ट केली तर या कारची किंमत 12 लाख रुपये होईल.

News Title – Windsor EV Launch

महत्त्वाच्या बातम्या-

मलायकाच्या वडिलांचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर; मिळाली धक्कादायक माहिती

झिका व्हायरस वेगाने फोफावतोय; मुंबई, पुण्यासह कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण?

पंकजा मुंडेंनंतर धनंजय मुंडेंची बारी?, शरद पवार नवा डाव टाकण्याच्या तयारीत

राज्यात पुन्हा मविआची सत्ता येणार, 180 जागा जिंकणार; कुणी केला दावा?

“..तर तुझाही आजीसारखाच गेम करू”; भाजप नेत्याची राहुल गांधींना थेट धमकी

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now