मुंबई | राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या हातात गेली अनेक वर्ष मुंबई महानगरपालिका होती. शिवसेनेच्या महापालिकेच्या काळातच बेस्टच खाजगीकरण झालं. तेव्हापासूनच बेस्ट कामगारांचे प्रश्न जटिल होत गेले मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठपुरावा करून अनेक बेस्ट कामगारांना त्यांचे हक्क मिळवून दिले. त्यापैकी एक महत्त्वाचे काम म्हणजे बेस्ट उपक्रमातील ८०० कॅजूअल कामगारांपैकी ३० कामगारांना मनसेच्या पाठपुरवठ्याने कायम सेवेत घेण्यात आले. तर उर्वरित कामगारांचा निर्णय अद्याप प्रलंबित असल्यामुळे आता या कामगारांनी उपोषणाचा पवित्रा घेतला आहे येत्या १५ तारखेपासून हे कामगार आझाद मैदान येथे उपोषणाला बसणार आहेत.
आज महाराष्ट्र नवनिर्माण बेस्ट कामगार कर्मचारी सेनेचे कार्याध्यक्ष केतन नाईक व इतर पदाधिकाऱ्यांनी यांनी बेस्ट भवनात धडक दिली जनरल मॅनेजर श्री विजय सिंघल यांच्या दालनाबाहेर ठिय्या मांडला आणि कामगारांच्या समस्या ऐकण्यास बेस्ट व्यवस्थापनाला भाग पाडले.
बेस्ट बसेसच्या तुटपुंज्या पुरवठ्यामुळे मुंबईकरांना लोकल ट्रेन प्रमाणे बसगाड्यांच्या मागे लटकत प्रवास करावा लागत आहे.दोन महिन्यांपूर्वी कंत्राटी कामगारांच्या संपामुळे मुंबईकरांना त्रास सहन करावा लागला होता त्या संपाअंती दिलेल्या आश्वासनांची पूर्तता देखील अद्याप झालेली नसून बेस्ट प्रशासन कारभार करताना सर्वच स्तरावर फोल ठरत असल्याची टीका मनसेने केली आहे. या सर्व विषयांबाबत मनसेच्या वतीने बेस्ट उपक्रमाला आठवड्याभरापूर्वी निवेदन दिले होते व चर्चा करण्यास विनंती केली होती परंतु बेस्ट प्रशासनाने या विषयाकडे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष केल्यामुळे मनसेने हे पाऊल उचलले आहे अशी माहिती मनसेच्या बेस्ट कामगार सेनेचे उपाध्यक्ष केतन नाईक यांनी दिली.
सरतेशेवटी विजय सिंघल यांनी मनसेच्या शिष्टमंडळाला भेट दिली आणि पुढील आठवड्यात पुन्हा भेटून सर्व समस्यांवर चर्चा करण्याचे आश्वासन दिले.इतकेच नव्हे तर जे कामगार उपोषणाला बसणार आहेत त्यांना उद्याच बेस्ट प्रशासन भेटेल व मागणी नीट समजून घेईल असे श्री सिंघल म्हणाले. यावेळी केतन नाईक यांनी बेस्ट अधिकारी यांना जाब विचारत काही महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. तर पुढे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आतातरी जनतेचे मुख्यमंत्री आणि बेस्ट जनरल मॅनेजर या कामगारांना न्याय देणार का? असा प्रश्न देखील केतन नाईक यांनी उपस्थित केला आहे.
येणाऱ्या काळात कामगारांचा प्रश्न चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कामगारांचे महत्त्वाचे मुद्दे १. बेस्टसाठी आयुष्यभर सेवा देणाऱ्या बेस्ट कामगारांच्या 750 मुलांना (casual labour) कायम सेवेत कधी सामावून घेणार.?
२. लोकल ट्रेन प्रमाणे आता मुंबईकर बेस्ट बसेसच्या मागे लटकून प्रवास करू लागले आहेत,हजारो कोटींची कंत्राट देऊनही या बसगाड्या बेस्टच्या ताफ्यात सामील झाल्या नाहीत,मुंबईकरांना आवश्यक असलेल्या बसगाड्या कधी मिळणार?
३. बेस्टमध्ये कायम कामगारांपेक्षा अधिक संख्येत कंत्राटी कामगार झाले आहेत,कंत्राटी कामगारांना समान काम समान वेतन कधी मिळणार.?
४. कंत्राटी कामगारांच्या आंदोलनानंतर फ्री बसपास आणि पगारवाढ देण्याच्या आश्वासन दिल गेल,त्याच काय झाल?
५. कायम कामगारांच्या पदोनत्तीबाबत निर्णय प्रलंबित,निवृत्त कर्मचाऱ्यांची देणी प्रलंबित,करारनाम्यातील सुविधा प्रलंबित.
महत्त्वाच्या बातम्या-






