सम्राट चौधरी बिहारचे नवे मुख्यमंत्री! जाणून घ्या थक्क करणारा राजकीय प्रवास

On: April 14, 2026 6:32 PM
Samrat Choudhary
---Advertisement---

Samrat Choudhary | बिहारच्या राजकारणातील मोठा सस्पेन्स अखेर संपला असून राज्यात एका नव्या युगाची सुरुवात झाली आहे. गेल्या दोन दशकांपासून सत्तेवर प्रभाव ठेवणाऱ्या नीतीश कुमार यांच्या युगाचा शेवट झाला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर पुढचा मुख्यमंत्री कोण होणार याबाबत जोरदार चर्चा सुरू होती. अखेर भाजपच्या बैठकीत सम्राट चौधरी यांची निवड करण्यात आली आणि त्यांनी राज्याच्या नेतृत्वाची धुरा स्वीकारली.

ही निवड केवळ नेतृत्व बदल नसून बिहारच्या राजकारणात (Bihar Politics) मोठा टर्निंग पॉइंट मानला जात आहे. भारतीय जनता पार्टी (भाजप) च्या वाढत्या प्रभावाचे हे मोठे उदाहरण मानले जात आहे. सम्राट चौधरी हे भाजपचे बिहारमधील पहिले मुख्यमंत्री ठरले असून त्यांच्या नेतृत्वावर मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.

सुरुवातीपासून मंत्रीपदापर्यंतचा प्रवास :

सम्राट चौधरी यांचा जन्म 16 नोव्हेंबर 1968 रोजी मुंगेर जिल्ह्यातील लखनपूर येथे झाला. त्यांचे वडील शकुनी चौधरी हे एक प्रभावी राजकारणी होते. सम्राट चौधरी यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात राष्ट्रीय जनता दल (RJD) मधून केली. 2000 साली परबत्ता मतदारसंघातून निवडून आल्यानंतर त्यांनी वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी मंत्रीपद भूषवले. त्या काळात ते बिहारमधील सर्वात तरुण मंत्री म्हणून ओळखले गेले. (Nitish Kumar resignation)

यानंतर त्यांनी राजकारणात सातत्याने प्रगती केली. 2014 मध्ये त्यांनी जनता दल युनायटेड (JDU) मध्ये प्रवेश केला, मात्र काही वर्षांतच त्यांनी पक्ष बदलत 2017 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये त्यांनी उपाध्यक्ष, नंतर विधान परिषद सदस्य आणि पुढे मंत्री अशी विविध पदे सांभाळत आपली ताकद सिद्ध केली.

Samrat Choudhary | तीन पक्षांचा अनुभव आणि मजबूत समीकरण :

सम्राट चौधरी (Samrat Choudhary) यांची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांनी बिहारमधील तीन प्रमुख पक्षांमध्ये काम केले आहे. या अनुभवामुळे त्यांना राज्याच्या राजकारणातील सर्व समीकरणांची सखोल जाण आहे. विशेषतः ‘लव-कुश’ (कुर्मी-कोइरी) समीकरणात ते कोइरी समाजाचे प्रभावी नेते मानले जातात, ज्यामुळे ओबीसी मतदारांमध्ये त्यांची मजबूत पकड आहे.

एकेकाळी नीतीश कुमार यांच्या विरोधात भूमिका घेणारे सम्राट चौधरी आज त्यांच्याच पाठिंब्याने मुख्यमंत्री झाले आहेत, ही बाब राजकारणातील बदलत्या समीकरणांची साक्ष देते. त्यांच्या नेतृत्वामुळे बिहारमध्ये नव्या राजकीय रणनीती आणि स्थैर्य येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता राज्याच्या विकासासाठी आणि प्रशासनासाठी ते कोणते निर्णय घेतात, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

News Title : Who is Samrat Choudhary? New Bihar CM’s Political Journey Explained

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now