मुलगा बोलला की वाजायची शिट्टी.. डॉक्टरांकडे नेताच झाला अजब खुलासा

On: August 9, 2023 3:08 PM
---Advertisement---

छत्रपती संभाजीनगर | छत्रपती संभाजीनगरमध्ये 14 वर्षाचा मुलगा तोंड उघडण्याचा प्रयत्न करताच शिट्टी वाजायची. बरं तो मुद्दामहून शिट्टी वाजवायचा असं नाही. तर ती आपोआपच वाजायची. यानंतर या मुलाला ताबडतोब रूग्णालयात नेण्यात आलं.

सुरूवातीला पालकांच्या लक्षात आलं नाही. नंतर रूग्णालयात गेल्यावर मुलाने खेळण्यातली शिट्टी गिळल्याचं (Swallowed the whistle) पालकांना समजलं. मुलाची स्थिती पाहून रूग्णालयातील डॉक्टर देखील अवाक झाले होते.

घाटी रूग्णालयातील कान नाक घसा विभागातील डाॅक्टरांनी अडकलेली शिट्टी (whistle) काढून मुलाची सुटका केली. खेळण्यातील शिट्टी श्वासनलिकेत खूप आतपर्यंत गेली होती. त्यामुळे मुलाला श्वास घेणंही अवघड होत होतं. त्यामुळे त्याला तत्काळ ऑक्सिजनवर ठेवण्यात आलं आहे.

मुलाने काही बोलण्याचा प्रयत्न केला तर शिट्टीचा आवाज येत होता. जवळपास अर्धा तासात एंडोस्कोपीद्वारे त्याच्या श्वासनलिकेत अडकलेली शिट्टी काढण्यात डाॅक्टरांना यश आलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now