आदित्य ठाकरेंचा काका राज ठाकरेंना खोचक टोला, म्हणाले…

On: November 30, 2022 1:19 PM
---Advertisement---

मुंबई | शिवसेना(Shivsena) आणि मनसे (MNS) हा वाद काही महाराष्ट्रासाठी नवीन नाही. दोन्ही गटाकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरूच असतात. त्यातच शिंदेंच्या बंडापासून मनसे प्रमुख राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी उद्धव ठाकरेंना(Uddhav Thackeray) चांगलेच धारेवर धरल्याचं दिसून येत आहे.

राज ठाकरे यांनी गोरेगावील एका कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरेंची नक्कल केली होती. तसेच राज ठाकरे म्हणाले होते की, तब्येतीचे कारण सांगून उद्धव ठाकरे घरात बसत होते. एकनाथ शिंदेंनी रात्रीत जादूची कांडी फिरवली तेव्हा त्यांना उद्वव ठाकरेंना कळाले. आधी ते घरात बसायचे पण आता सगळीकडं फिरत आहेत, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला होता.

राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या आजारपणाची नक्कल केल्यानं, ठाकरे समर्थक नाराज आहेत. नुकतेच आदित्य ठाकरे(Aaditya Thackeray) यावर बोलताना म्हणाले, त्यांनी काही बोलले तरी मी त्यावर बोलणार नाही. कारण माझे संस्कार तसे नाहीत.

पुढं आदित्य ठाकरे असंही म्हणाले की, त्यांनी एकेकाळी माझ्या आजोबांचं जेवणही काढलं होतं. असं म्हणत आदित्य ठाकरेंनी यावर जास्त बोलणं टाळलं.

दरम्यान, आजारपणाचं कारण सांगून जी व्यक्ती लोकांना भेटत नव्हती, पण तीच व्यक्ती मुख्यमंत्रीपदावरून गेल्यावर हे सगळं बदलले. ज्यावेळी लोकं म्हणायचे, आम्हाला मुख्यमंत्र्यांना भेटायचं आहे, पण त्यावेळी ते भेटत नव्हते,असं राज ठाकरे उद्धव ठाकरेंबद्दल बोलताना म्हणाले होते.

हा विषय आरोग्याचा आणि तब्येतीचा नाही. मला काय म्हणायचं आहे ते समजून घ्या, असंही राज ठाकरे म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या-

Join WhatsApp Group

Join Now