मुंबई | मराठी माणसाच्या मनावर राज्य करणारे. मुंबईसाठी झटणारे आणि हिंदूह्द्यसम्राटम्हणून लोकांच्या मनावर राज्य करणारे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची आज जयंती. त्यानित्ताने अनेक कार्यक्रमांचे आयोजन शिंदे आणि ठाकरे गटाकडून करण्यात आलं आहे. अनेक नेत्यांनी ट्विट आणि पोस्ट करत बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी देखील बाळासाहेबासोबतच्या शेवटच्या भेटीचा किस्सा सांगितलाय. यावेळी ते भावनिक झाल्याचं दिसून आले.
महाराष्ट्राच्या राजकारणातले एक चर्चेतलं काका-पुतण्या म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे(Raj Thackeray). शिवसेनेची सगळी सूत्र राज ठाकरे यांच्याकडे जाणार असं प्रत्येकालाच वाटत होतं मात्र पक्षाची सगळी सूत्र उद्धव ठाकरेंकडे गेली. यामुळेच काका-पुतण्याच्या नात्यात फुट पडली.
राज ठाकरे यांनी शिवसेनेतून (Shiv Sena) बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. 2005 ला ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले. 2006 ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाली. पक्ष सोडताना देखील राज ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत चर्चा केली बंड किंवा भांडण केलं नाही हे खुद्ध राज ठाकरेंनी सांगितलं आहे.
जेव्हा बाळासाहेबांना कळालं की हा काही आता पक्षात राहत नाही. तेव्हा ती आमची शेवटची भेट होती. ही गोष्ट मी कधी कोणाला बोललो नाही. मी निघताना त्यांनी मला आत बोलावलं, मिठ्ठी मारली आणि आता जा असं म्हणाले. हा किस्सा राज ठाकरेंनी त्या व्हिडीओत सांगितला आहे.
महत्त्वाच्या बातम्या






