Groom Dance | भारतात सध्या लग्न सोहळ्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यातील काही व्हिडिओ आनंदाचे, हसवणारे असतात तर काही मनाला स्पर्श करणारे देखील असतात. लग्नात नवरदेव आणि वधूच्या एंट्रीपासून ते त्यांच्या डान्सपर्यंत अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) पाहायला मिळत आहेत. पण दिल्लीतील एका लग्नात नवरदेवाला डान्स करणे चांगलेच महागात पडले आहे.
नवरदेवाकडे त्याच्या मित्रांनी (Friends) पुन्हा पुन्हा डान्स करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर नवरदेव ‘चोली के पिछे’ (Choli Ke Piche) या गाण्यावर नाचू लागला. हे पाहून त्याच्या सासऱ्याला (Father-in-law) राग आला आणि त्यांनी लग्न मोडल्याचे समोर आले आहे.
‘चोली के पिछे’ गाण्यावर डान्स अन् लग्न मोडले
मिळालेल्या माहितीनुसार, नवरदेव Groom Dance सर्वांचे मनोरंजन करण्यासाठी ‘चोली के पिछे’ या गाण्यावर नाचला होता. मात्र, हे त्याच्या सासऱ्याला आवडले नाही. त्यांनी थेट लग्न मोडण्याचा निर्णय घेतला. याबाबत एक पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली आहे. दिल्लीतील या लग्नात नवरदेव जेव्हा लग्नाच्या ठिकाणी पोहोचत होता, तेव्हा मिरवणुकीत ‘चोली के पिछे क्या है’ या लोकप्रिय गाण्यावर त्याने तुफान डान्स केला. याच डान्समुळे त्याचे लग्न मोडले आहे.
पाहुण्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवरदेवाचे Groom Dance मित्र त्याला डान्स करण्यासाठी सांगत होते. त्यानंतर नवरदेवानेही मित्रांच्या आग्रहाखातर डान्स केला. त्यालाही डान्स करताना खूप आनंद होत होता. अनेक पाहुण्यांनी देखील त्याच्या डान्सचा आनंद घेतला. पण नवरदेवाच्या सासऱ्यांना हे आवडले नाही. त्यांनी याला कौटुंबिक मूल्यांचा अपमान असल्याचे म्हटले आहे.
‘खलनायक’ (Khalnayak) सिनेमातील वादग्रस्त गाणे
अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) यांचा ‘खलनायक’ सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमातील ‘चोली के पिछे क्या है’ हे गाणे वादात सापडले होते.
‘चोली के पिछे क्या है’ हे गाणे खूप लोकप्रिय देखील झाले होते. हे गाणे अलका याज्ञिक (Alka Yagnik) आणि इला अरुण (Ila Arun) यांनी गायले होते. पण हे गाणे सध्या एका नवरदेवाचे लग्न मोडल्यामुळे पुन्हा चर्चेत आले आहे.






