हवामान विभागाकडून मोठी अपडेट; महाराष्ट्राला पुन्हा पाऊस झोडपणार

On: April 28, 2024 9:14 PM
Maharashtra Monsoon Forecast
---Advertisement---

Weather Update | यंदा राज्याला अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं आहे. लातूर, रत्नागिरी आणि साताऱ्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. यंदाही मान्सून दमदार हजेरी लावणार आहे. हवामान खात्याने (IMD) पावसाचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचं सावट राहणार असल्याचं भाकीत केलं. (Weather Update)

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचे अधिक प्रमाण आहे. हवामान खात्याने यंदा मान्सूनच्या हंगामात या तिन्ही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. केवळ पाऊस नसून वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. (Weather Update)

हवामान विभागाने (Weather Update) वर्तवलेल्या अंदाजानुसार यंदाच्या मान्सून ऋतूमध्ये पावसासह 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहू लागणार असल्याची दाट शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रात पाऊस होणार असून त्यासह वादळी वाऱे वाहणार आहेत.

राज्यातील ‘या’ भागात यलो अलर्ट जारी

पुण्यासह सातारा, छ. संभाजीनगर, अहमदनगर, जालना, बुलढाणा, जळगाव, वाशिम, अकोला, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, या जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Weather Update)

वाशिममध्ये सर्वाधिक तापमान

उन्हाळा ऋतूचा हंगाम आहे. अंगाची लाहीलाई होते. बाहेर पडताना हवामान अभ्यासक आपल्या शरीराची काळजी घेण्याचं आवाहन करत आहेत. राज्यामध्ये काही भागात अवकाळी पाऊस सुरू आहे. तर राज्यात अनेक ठिकाणी उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. वाशिममध्ये सर्वाधिक 43 अंश सेल्सिअस तापमान असल्याची माहिती हवामान खात्यानं दिलीये.

News Title – Weather Update Once Again Rain Came In Maharashtra

महत्त्वाच्या बातम्या

‘…तर गाठ माझ्याशी आहे’; अजित पवारांनी दिला दम

“आपला एकच विरोधक आहे”, मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं ‘त्या’ नेत्याचं नाव

“पाकिस्तानात जाऊन विचारा शिवसेना कोणाची, कोणीही सांगेल उद्धव ठाकरेंची”

तरुणांसाठी खुशखबर! स्टार्टअपसाठी सरकारकडून मिळणार तब्बल ‘इतक्या’ लाखांचं लोन

व्हॉट्सॲपवर स्टेटस ठेवत प्रसिद्ध अभिनेत्रीने संपवलं आयुष्य!

Join WhatsApp Group

Join Now