काळजी घ्या! ‘या’ शहरात 10 वर्षानंतर सर्वाधिक तापमान

On: April 17, 2024 5:52 PM
Maharashtra Weather
---Advertisement---

Weather Update | राज्यात वाढत्या तापमानामुळे उष्मघाताचा अनेकांना सामना करावा लागत आहे. यामुळे राज्यातील नागरिकांचं जगणं मुश्किल होऊन बसलं. मुंबई, रायगड आणि ठाण्यामध्ये उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. आतापर्यंत 10 वर्षात तापमान वाढलं नव्हतं ते तब्बल 10 वर्षानंतर पुन्हा पाहायला मिळालं. अनेक वर्षानंतर तापमानाच्या उच्चाकांत वाढ झाली आहे. (Weather Update)

तब्बल 10 वर्षानंतर तापमानात वाढ

मुंबई येथील सांताक्रूज येथे 39.7 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान आहे. तर ठाण्यामध्ये सर्वाधिक 42 अंश सेल्सिअस सरासरी तापमान आहे. या वाढलेल्या तापमानामुळे मुंबईकर आणि राज्यातील लोकांच्या अंगाची लाही लाई झाली. चार अंशाने तापमान वाढलं असल्याची माहिती समोर आली. (Weather Update)

मुंबईत मंगळवारी 4 अंश सेल्सिअसने तापमान वाढलं. याआधी 22 एप्रिल रोजी मुंबईमधील 39 अंश सेल्सिअस तापमान पोहोचलं. मंगळवारी त्यात आणखी वाढ झाली ते तपमान 39.4 अंश सेल्सिअसने वाढलं आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने तापमान वाढतंय. यामुळे मुंबईमध्ये नागरिक कमालीचे त्रस्त झालेत. (Weather Update)

10 पक्षी रूग्णालयात दाखल

वाढत्या उन्हामुळे पक्षांना फटका बसला आहे. मुंबईत एप्रिल महिन्याच्या सुरूवातीपासून आतापर्यंत उष्णतेने पक्षाना फटका बसला. 100 हून अधिक पक्षांचं जीवन धोक्यात आहे. त्यांना उन्हाचा त्रास झाला असल्याची माहिती समोर आली. तसेच त्यातील 10 पक्षांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं.

मुंबईत 22 कबुतरे, 16 कावळे, एक पोपट, दोन मैना, 17 घारींच्या उष्मघाताने पक्षी त्रस्त आहेत. मुंबई, रायगड, ठाणे येथे 15 आणि 16 एप्रिल रोजी हवामान खात्याने अधिक उष्णतेचा इशारा दिलाय.

News Title – Weather Update Of Mumbai, Thane And Raigad In Very High Temperature

महत्त्वाच्या बातम्या

लोकसभेच्या रिंगणात वंचितचा लढा कुणाविरोधात?, प्रकाश आंबेडकरांनी स्पष्टच सांगितलं

ऐश्वर्याने उरकलं दुसरं लग्न, लग्नाचे फोटो आले समोर

गुड न्यूज; गुंतवणूकदारांचे पैसे होणार दुप्पट

नवीन कार खरेदी करताय? तर अशाप्रकारे घ्या काळजी

एकनाथ खडसे यांना दाऊद इब्राहिम आणि छोटा शकीलच्या गँगकडून धमकीचे फोन!

Join WhatsApp Group

Join Now