‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता; हवामान विभागाकडून मोठी अपडेट

On: May 1, 2024 8:49 PM
Weather Update
---Advertisement---

Weather Update | वाढत्या उन्हामुळे अंगाची लाहीलाही होताना दिसत आहे. तर काही ठिकाणी उष्मघाताचे प्रमाण वाढले आहे. अशा परिस्थितीत हवामान विभागाने (Weather Update) काळजी घेण्याचं आवाहन केलंय. दरम्यान याचसह राज्याला अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान तर झालंच मात्र शेतकऱ्याला यातून कसलाही परतावा मिळाला नाही. (Weather Update)

मुसळधार पावसाची शक्यता

हवामान विभागाने (Weather Update) मोठी अपडेट दिलीये. पुन्हा एकदा विदर्भ आणि मराठवाडा तसेच राज्याच्या इतर काही भागांमध्ये पावसाने नको नको करून ठेवलं आहे. पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा हवामान (Weather Update) खात्याने अंदाज वर्तवला आहे. विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार आहे.

वादळी वाऱ्यासह पाऊस हजेरी लावणार आहे. वाऱ्याचा वेग प्रति तास हा 30-40 किमी असू शकतो. हवामान विभागाकडून पुणे, जळगाव, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर ठाणे, नाशिक या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

एका बाजूला अवकाळी पावसाने धिंगाणा घतला असून दुसऱ्या बाजूला उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. यामुळे अनेक गोष्टींचा सामना करावा लागत आहेत. राज्यामध्ये सर्वाधिक तापमान पाहिल्यास सोलापूर जिल्ह्यातील जेऊर येथे 44.5 अंश सेल्सिअस तापमान आहे.

‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट

तर मुंबई आणि मुंबई उपनगराच्या तापमानाबाबत पाहिल्यास उष्ण वातावरण पाहायला मिळत आहे. गेल्या दोन तीन दिवसांदरम्यान वातावरण स्थिर आहे. त्याआधी मुंबई आणि मुंबई उपनगरामध्ये उष्णतेत वाढ निर्माण झाली होती. तर हवामान विभागाकडून सोलापूर, अकोला, अमरावती, वर्धा या जिल्ह्यांना उष्णतेचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. यात 42 ते 44 अंश सेल्सिअस तापमान राहिल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.

दरम्यान, या उन्हामुळे पक्षी, प्राणी आणि वन्यजीवांचे हाल होताना दिसत आहेत. किमान पक्षांसाठी खिडकी तसेच गॅलरीमध्ये पाण्याची तजवीज करून ठेवण्याचं आवाहन करण्यात येतंय. तर शक्यतो दुपारी बाहेर जाणं टाळावं असं देखील ते सांगतात.

News Update – Weather Update News update About Unseasonal Rain

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यातून आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्यावर भर- मुरलीधर मोहोळ

“थोडं कमी पीत जा”; प्रसिद्ध अभिनेत्रीचा व्हिडीओ तूफान व्हायरल

“आता सभा घेऊन कोणाची पोरं खेळवणार?”

“आमच्या डोक्यात प्रकाश पडायला…”, अजित पवारांचा सुप्रिया सुळेंवर पलटवार

अखेर नाशिकच्या जागेचा तिढा सुटला, शिवसेनेकडून ‘या’ नेत्याला उमेदवारी जाहीर

Join WhatsApp Group

Join Now