Weather Update | पुन्हा पाऊस कोसळणार; हवामान विभागाचा मोठा इशारा

On: December 26, 2023 11:21 AM
Weather Update
---Advertisement---

Weather Update | राज्यात आधीच अवकाळी पावसाने प्रचंड नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावला. आता पुन्हा राज्यात पावसाचं असल्याचं पाहायला मिळतं. नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच राज्यात पाऊस पडण्याची (Weather Update) शक्यता आहे.

Weather Update | हवामान विभागाचा मोठा इशारा

वर्षअखेर आणि नवीन वर्षांत पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी रोजी महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांत पाऊस पडणार असल्याचा अंदाज आयएमडीने व्यक्त केला आहे.

Weather Update | ‘या’ राज्यामध्ये पावसाची शक्यता

30 डिसेंबर ते 1 जानेवारी दरम्यान तामिळनाडूतील किनारपट्टीवरील भागांत पाऊस पडण्याचा अंदाज आहे. त्यानंतर महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, गोवा, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड या ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

हवामान तज्ज्ञांच्या मते, वर्षाच्या शेवटच्या दिवसापासून म्हणजेच 31 डिसेंबरपासून नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय होईल. त्यामुळे राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि तामिळनाडूमध्ये ढगांच्या आच्छादनासह विखुरलेला पाऊस पडेल.

सरासरीपेक्षा कमी पाऊस महाराष्ट्रात आणि देशातील काही भागांत झाला. त्यानंतर अवकाळी पावसाचा फटका शेतीला बसला. आता नवीन वर्षांत पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

दरम्यान, देशाच्या हवामानावर वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम दिसून येत आहे. आयएमडीच्या (IMD) ताज्या हवामान अंदाजानुसार मैदानी भागात पाऊस पडण्याची शकता आहे. तसेच हिमाचल प्रदेशसह काश्मीर खोऱ्यात पाऊस आणि बर्फवृष्टीनंतर तापमानात आणखी घट होईल, असा अंदाज आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

Maratha Reservation | मराठा आरक्षणाबाबत एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची अपडेट!

Prakash Ambedkar | उद्धव ठाकरेंबाबत प्रकाश आंबेडकरांचा मोठा गौप्यस्फोट!

Aishwarya Rai च्या ‘या’ गोष्टीमुळे संपूर्ण बच्चन कुटुंब अडचणीत!

IND vs SA | दिग्गजांना जमलं नाही ते रोहित शर्मा करून दाखवणार?; भारताला इतिहास रचण्याची संधी

Ajit Pawar | ‘अमोल कोल्हेंना पाडणार म्हणजे पाडणारच’; अजित पवारांची गर्जना

 

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now