रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट, आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना दिले हेल्पलाइन नंबर

On: May 16, 2025 4:34 PM
weather update
---Advertisement---

Weather Update | रत्नागिरी जिल्ह्यात १५ ते १८ मे दरम्यान वादळी वाऱ्यांसह पावसाचा यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार यावेळी गडगडाटासह हलक्यापासून मध्यम स्वरूपाचा पाऊस, विजा आणि ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाचा इशारा-

भारतीय हवामान विभागाने (Weather Update) दिलेल्या या यलो अलर्टच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. विजा चमकताना घराबाहेर जाणे टाळा, मोबाईल व इलेक्ट्रिक उपकरणांचा वापर कमी करा आणि सुरक्षित स्थळी आश्रय घ्या, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

अधिकृत माहिती (Weather Update) मिळवण्यासाठी https://mausam.imd.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी आणि अफवांवर विश्वास ठेवू नये. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी खालील क्रमांकांवर संपर्क साधावा:

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष,

जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी ०२३५२- २२६२४८/ २२२२३३.
जिल्हा पोलिस नियंत्रण कक्ष ०२३५२-२२२२२२.
पोलिस टोल फ्री हेल्पलाइन ११२.
जिल्हा शासकीय रुग्णालय ०२३५२-२२२३६३.
महावितरण नियंत्रण कक्ष ७८७५७६५०१८

जिल्ह्यातील तहसील कार्यालये-

रत्नागिरी ०२३५२- २२३१२७,
लांजा ०२३५१- २३००२४,
राजापूर ०२३५३- २२२०२७
संगमेश्वर ०२३५४- २६००२४
चिपळूण ०२३५५- २५२०४४/९६७३२५२०४४
खेड ०२३५६- २६३०३१
दापोली ०२३५८- २८२०३६
गुहागर ०२३५९- २४०२३७
मंडणगड ०२३५०- २२५३३६

News Title – weather update helpline for ratnagiri District during rain

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now