‘या’ गोष्टीमुळे हवामान विभागाला वातावरणाचा अंदाज समजतो!

On: April 1, 2024 7:53 PM
weather update
---Advertisement---

Weather Update | राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाने अंगाचं पाणी पाणी केलं आहे. राज्यात शिमग्यानंतर उकाडा दिवसेंदिवस वाढत असताना दिसत आहे. मात्र काही ठिकाणी पाऊसाच्या हलक्या सऱ्यांमुळे वातावरण गार केलं आहे. राज्याच्या काही भागात पाऊस तर काही भागात प्रचंड उकडा सुरु असलेलं चित्र पहायला मिळत आहे. मुंबई, पुणे, नाशिक, या सारख्या शहरात 40% पुढे वातावरण असल्याचं म्हटलं आहे. एवढंच नाही तर येत्या काही दिवसात तापमान वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मात्र, तापमान कमी जास्त कसं होतं?, हवामान विभागाला कसं समजतं? असा प्रश्न अनेकांना निर्माण होतो.

यंत्र, उपकरणं वापरली जातात-

हवामानाचा अंदाज (Weather Update) बांधण्यासाठी अनेक घटक विचारात घेतले जातात. यासाठी विविध उपकरणांच्या साह्याने वातावरण, जमिनीच्या पृष्ठभागाचं तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग व दिशा, दव, ढगांची स्थिती इत्यादी घटकांचं निरीक्षण केलं जातं. यासाठी अनेक प्रकारची यंत्रं आणि उपकरणं वापरली जातात.

पावसासाठी पर्जन्यमापक, वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी ॲनिमोमीटर, वाऱ्याची दिशा तपासण्यासाठी विंडव्हेन, बाष्पीभवनाचा दर मोजण्यासाठी पॅन-इव्हॅपोरिमीटर, सनशाइन रेकॉर्डर, दव मोजण्यासाठी ड्यू-गेज, जमिनीचे तापमान मोजण्यासाठी थर्मामीटर इत्यादींचा वापर केला जातो.

डेटाचा अभ्यास केला जातो-

याशिवाय हाय-स्पीड कम्प्युटर, हवामानविषयक उपग्रह (Weather Update), एअर बलून आणि वेदर रडार ही उपकरणंदेखील हवामानाची माहिती गोळा करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. गोळा केलेल्या सर्व डेटाचा अभ्यास केला जातो. सध्याचा डेटा आणि मागचा हवामान डेटादेखील पाहिला जातो आणि यानंतर हवामानाचा अंदाज बांधला जातो.

पृथ्वीची छायाचित्रं पाठवणे-

हवामान खात्याचे अनेक उपग्रह आहेत. ते सतत पृथ्वीची छायाचित्रं पाठवत असतात. त्यामुळे आकाशात ढग आहेत की नाहीत याचा अंदाज घेता येतो. पावसाचा अंदाज घेण्यासाठी ढगांमध्ये किती पाणी आहे, हे बघावं लागतं. त्यासाठी पृथ्वीवरून आकाशाच्या दिशेने रडार सोडलं जातं. रडारद्वारे पाठवलेल्या वेव्ह्ज ढगांवर आदळून परत येतात आणि नंतर त्यांचा अभ्यास केला जातो. त्यानंतर कुठे पाऊस पडू शकतो, याचा अंदाज हवामान खात्याला वर्तवता येतो.

News Title : weather update comes to know about climate

महत्त्वाच्या बातम्या-

वाढदिवसादिवशी ऑनलाईन केक मागवला अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं, व्हिडीओ व्हायरल

मोठी बातमी! महाराष्ट्रातील बड्या बँकेत मोठा घोटाळा

काळजाचा ठोका चुकवणारा अपघात, कारचा चक्काचूर, एकाच कुटुंबातील…

पांड्याला ट्रोल केल्यास कारवाई होणार? मुंबई क्रिकेट असोसिएशननं सांगितलं सत्य

फक्त अशी घरं पाहून मारायचे डल्ला, मुंबईच्या चोरट्यांची पुण्यातल्या घरांवर वक्रदृष्टी

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now