Weather Update | डिसेंबर महिन्यात थंडी काय म्हणणार?, महत्त्वाची माहिती

On: December 12, 2023 8:51 PM
weather update
---Advertisement---

Weather Update | महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने कमबॅक केलं होतं. अवकाळी पावसामुळे काही राज्यात रब्बी पिकांना फायदा झाला तर दुसरीकडे काही राज्यात रब्बी पिकांना मोठा फटका बसला, ज्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. मात्र, डिसेंबर महिन्यात पावासाने आता काही भागात विश्रांती घेतली आहे आणि थंडीची चाहूल सुरु झाली आहे.

राज्यात महिन्याच्या (Weather Update) पहिल्या आठवड्यापासून थंडीने डोकं वर काढलं आहे. राज्याच्या काही भागात झपाट्याने थंडी वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर हवामान विभागाने महत्त्वाची माहिती दिली आहे.

तापमानाचा पारा घसरत आहे?

हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सध्या किमान तापमानाचा पारा खाली घसरत असताना पहायला मिळत आहे. मात्र, किमान तापमान डिसेंबरमध्ये असायला पाहिजे तसं त्या पातळीवर दिसत नाही किंवा अजूनही आलेले नाही, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

हवामान विभागाकडून काय माहिती मिळाली?

राज्यात पाहिजे तशी थंडी आणखी जाणवत नाहीये. सध्याची थंडीचे किमान तापमान सरासरीपेक्षा अधिकच आहे. डिसेंबरमधील थंडी ह्याच पातळीत राहील असे वाटते. सध्याचे महाराष्ट्रातील तापमान वेगवेगळ्या भागात 15 ते 17 अंश सेल्सिअसच्या दरम्यान म्हणजे सरासरीपेक्षा 2 अंश सेल्सिअसने अधिक आहे.

Weather Update दुपारचं तापमान-

महाराष्ट्रातील दुपारचे कमाल तापमान सध्या 29 अंश सेल्सिअसदरम्यान म्हणजे सरासरीपेक्षा 1 अंश सेल्सिअस कमी आहे. म्हणजे दुपारचा थंडावा अजून आहे असं देखील हवामान विभागाने सांगितलं आहे. महाराष्ट्रात काही दिवसात अपेक्षित असलेल्या किरकोळ पावसाची शक्यताही आता मावळली असल्याची माहिती हवामान विभागाने म्हटलं.

News Title : weather update climate in December

थोडक्यात बातम्या-

Team Indiaच्या गोलंदाजानं उडवला हाहाकार!, 11 धावांच्या आत घेतल्या 7 विकेट

Manoj Jarange | जरांगे पाटील यांना नेमकं झालं काय? मोठी माहिती समोर

RBI | तुम्ही कर्ज घेतलं असेल तर ‘ही’ बातमी नक्की वाचा!

Sharad Pawar | ‘शरद पवारांनी राजकारणापासून दूर जावं’; वाढदिवशी कोणी दिला सल्ला?

Rajasthan CM | भाजपचा आणखी एक झटका; राजस्थानमधून मोठी बातमी समोर

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now