वाल्मिक कराडचा तुरुंगातील मुक्काम वाढला! ‘या’ तारखेला होणार पुढील सुनावणी

On: July 22, 2025 1:09 PM
Walmik Karad
---Advertisement---

Walmik Karad | बहुचर्चित संतोष देशमुख खून प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या वाल्मिक कराड (Walmik Karad) याला कोर्टाकडून मोठा झटका बसला आहे. दोषमुक्तीसाठी (Discharge Application) त्याने सादर केलेला अर्ज कोर्टाने फेटाळून लावला असून, त्यामुळे त्याचा तुरुंगातील मुक्काम आणखी वाढणार आहे. तसेच आता या प्रकरणातील पुढील सुनावणी ४ ऑगस्ट रोजी होणार आहे.

अर्ज फेटाळल्यानं कराड अडचणीत :

वाल्मिक कराडसह अन्य आरोपींनी दोषमुक्तीसाठी अर्ज दाखल केले होते, त्यामुळे सुनावणी वारंवार लांबणीवर जात होती. यावर सरकारी पक्षातर्फे ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी जोरदार युक्तिवाद करत “सुनावणी मुद्दाम लांबवली जात आहे, न्यायालयाचा वेळ वाया जातोय, त्वरित निकाल हवा” अशी भूमिका मांडली.

कोर्टाने हा युक्तिवाद ग्राह्य धरत कराडचा दोषमुक्ती अर्ज फेटाळला, ज्यामुळे त्याच्यासह अन्य आरोपींवर आरोप निश्‍चित राहिले आहेत.

Walmik Karad | महादेव मुंडे हत्या प्रकरणाशी संबंध? :

या प्रकरणात एक नव वळणही समोर आलं आहे. विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांनी कोर्टात दावा केला की, महादेव मुंडे हत्या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी व्यक्तीचीही हत्या करण्यात आली आहे, आणि या प्रकरणात वाल्मिक कराड व त्याचा मुलगा थेट सहभागी आहेत. (Walmik Karad)

“महादेव मुंडे प्रकरणात जो समोर येईल, त्याला संपवण्याचे काम वाल्मिक कराडच्या गँगकडून केलं जातं,” असा गंभीर आरोप बांगर यांनी केला आहे.

News Title: Walmik Karad’s Discharge Application Rejected in Santosh Deshmukh Murder Case – Jail Stay Extended

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now