वाल्मिक कराडच्या बायकोच्या शेतात काम करणाऱ्यांचा धक्कादायक खुलासा!

On: January 18, 2025 4:58 PM
Walmik Karad
---Advertisement---

Walmik Karad | बीडच्या (Beed) मस्साजोग (Massajog) गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येनंतर (Murder) राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात वाल्मिक कराड याच्यावर आरोप (Allegations) करण्यात आल्याने त्याच्या अडचणी वाढल्या आहेत. (Walmik Karad)

फरार असलेला वाल्मिक कराड पुण्यात (Pune) सीआयडीला (CID) शरण (Surrender) आला. त्यानंतर त्याच्यावर मकोकाअंतर्गत (MCOCA) कारवाई करण्यात आली आहे. यामुळे अडचणीत सापडलेल्या वाल्मिक कराडचा पाय आता आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, वाल्मिक कराडची दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधव हिच्या शेतात काम करणाऱ्या सालगड्याने गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे.

तीन महिन्यांपासून मजुरी (Wages) नाही; कुटुंबावर उपासमारीची वेळ

वाल्मिक कराडची दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधव हिच्या शेतात सालगडी म्हणून काम करणाऱ्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. लातूर (Latur) जिल्ह्यातील रेणापूर (Renapur) तालुक्यातील शिंदे माने (Shinde Mane) हे कुटुंब ज्योती जाधव यांच्या शेतात काम करते. मात्र, या कुटुंबाला गेल्या तीन महिन्यांपासून मजुरीच मिळाली नसल्याचा आरोप (Allegation) शिंदे माने कुटुंबाकडून करण्यात आला आहे. (Walmik Karad)

शाळेतील तांदुळावर (Rice) भागवतात भूक

गेल्या सात महिन्यांपासून हे कुटुंब वाल्मिक कराडची दुसरी पत्नी ज्योती जाधव यांच्या शेतात काम करत आहे. परंतु, गेल्या तीन ते चार महिन्यांपासून ज्योती मंगल जाधव यांनी कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत (Financial Help) केली नसल्याचा दावा या कुटुंबाने केला आहे. त्यामुळे आता या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. हे कुटुंब गेल्या तीन महिन्यांपासून मुलांना मिळणाऱ्या शाळेतील तांदुळावर आपली भूक भागवत आहे.

अंजली दमानियांचा (Anjali Damaniya) गौप्यस्फोट

दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बार्शी (Barshi) तालुक्यातील शेंद्री (Shendri) गावात वाल्मिक कराडची दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधव हिच्या नावावर ३६ एकर जमीन असल्याचा दावा ट्विटरद्वारे (Twitter) केला होता.

बार्शीतल्या शेंद्री गावात एकूण चार शेतजमिनी (Farms) ज्योती जाधव हिच्या नावावर खरेदी (Purchase) करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्याचे क्षेत्रफळ साधारण ३६ एकर इतके असून त्याचे अंदाजे मूल्य सुमारे दीड कोटी रुपये इतके आहे. या जमिनी दोन वर्षांच्या कालावधीत खरेदी करण्यात आल्या आहेत. (Walmik Karad)

Title : Walmik Karad  troubles mount as farm laborer working for his second wife alleges non-payment of wages

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now