रुग्णालयात कैद्यांसाठीचे प्रोटोकॉल डावलून कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट?; धक्कादायक माहिती समोर

On: January 26, 2025 8:52 AM
Walmik Karad received special treatment at the hospital
---Advertisement---

Walmik Karad | सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) खून प्रकरणातील आणि खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी वाल्मिक कराड (Walmik Karad) याला पोटदुखीचा त्रास जाणवू लागल्याने त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, सामान्य कैद्यांसाठी स्वतंत्र कोठडीची सुविधा असतानाही, कराडला मात्र चक्क ‘मिनी आयसीयू’ची सुविधा असणार्‍या सर्जिकल वॉर्डमध्ये दाखल करून विशेष वागणूक देण्यात येत असल्याचे समोर आले आहे.

धक्कादायक बाब म्हणजे, त्याच्यासाठी इतर रुग्णांना इतरत्र हलविण्यात आल्याची देखील माहिती मिळाली आहे. हा सगळा प्रकार सुरक्षेच्या कारणास्तव करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे, मात्र कारागृहाच्या कोठडीबाहेर कसली सुरक्षा? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

स्वतंत्र कोठडी असताना विशेष कक्षात उपचार का?

जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणार्‍या कैद्यांसाठी जुन्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर एक स्वतंत्र कोठडी आहे. या कोठडीत चार खाटांची सोय असून, एक मजबूत लोखंडी दरवाजा देखील आहे. शनिवारी दुपारच्या सुमारास, परळी येथील एका गुन्ह्यातील आरोपी या कोठडीत उपचार घेत होता, आणि इतर तीन खाटा रिकाम्या होत्या. असे असतानाही, कराडला चक्क सर्जिकल वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आणि त्याच्यावर तिथेच उपचार सुरू करण्यात आले.

सुविधांनी युक्त सर्जिकल वॉर्ड

रुग्णालयातील सर्जिकल वॉर्ड सर्व प्रकारच्या आधुनिक सुविधांनी युक्त असून, अत्यंत स्वच्छ ठेवण्यात आला आहे. एका खासगी रुग्णालयापेक्षाही हा वॉर्ड अधिक सुसज्ज असल्याचे दिसून येते. याच वॉर्डमध्ये कराडवर उपचार सुरू आहेत. या वॉर्डात एकूण २४ खाटा आहेत. कराडला एका बाजूच्या स्वतंत्र खाटेवर ठेवण्यात आले असून, इतर ११ खाटा रिकाम्या ठेवण्यात आल्या आहेत.

कराडला चकाचक आणि सर्व सुविधांनी युक्त अशा वॉर्डमध्ये ठेवण्यासाठी, सुरक्षेच्या कारणास्तव इतर रुग्णांना बाहेर काढण्यात आले होते. या ठिकाणी आरसीपीसह इतर जवळपास १० ते १५ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी २४ तास तैनात असल्याचे दिसून आले. येथे इतर रुग्णांच्या नातेवाईकांची कसून तपासणी केली जात होती.

कराडला डिस्चार्ज

कराडच्या सर्व वैद्यकीय तपासण्या पूर्ण झाल्यानंतर, डॉक्टरांनी त्याची प्रकृती स्थिर असल्याचे जिल्हा कारागृह प्रशासनाला कळविले. त्यानुसार रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास कराडला रुग्णालयातून रजा देण्यात आली आणि त्याची पुन्हा कारागृहात रवानगी करण्यात आली.

Title : Walmik Karad received special treatment at the hospital

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now