भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात वाघ बकरीचे मालक पडले, ब्रेन हॅमरेजमुळे मृत्यू

On: October 23, 2023 2:15 PM
---Advertisement---

अहमदाबाद | वाघ बकरी चहा (Wagh Bakri Tea) हा गुजरात मधील फेमस ब्रॅंड म्हणून ओळखला जातो. या ब्रॅंडचे संचालक आणि मालक पराग देसाई (Parag Desai) यांचं निधन झाल्यामुळे सगळीकडे हळहळ व्यक्त होत आहे. वयाच्या 49 वर्षी पराग देसाई काळाच्या पडद्याआड गेले. त्यांच्या निधनामुळे उद्योगजगत आणि सामाजिक क्षेत्राला धक्का बसला आहे.

पराग देसाई काही दिवसांपूर्वी माॅर्निंग वाॅकला गेले होते. दरम्यान यावेळी त्यांच्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला होता. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केलं असता त्याचं ब्रेन हेमरेज (Brain Hamour) झालं. अहमदाबादमधील रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांचं निधन झालं.

पराग देसाई रोज सारखे माॅरर्निंग वाॅकला गेले होते. त्यावेळेस त्यांच्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. स्वत:ला वाचवत असाताना त्यांचा पाय घसरला आणि त्यांचा तोल गेला. त्यावेळी ते खाली पडून जबर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. त्यांच्या मेंदूतून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला होता.

पराग देसाई यांची अहमदाबाद येथील झायडस (Zydus Hospital) रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात येणार होती.  त्यानंतर त्यांची प्रकृती अधिक खालावली यामुळे त्यांना उपचारांसाठी दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आलं. मृत्यू आधी त्यांना सात दिवस व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आलं होतं. दरम्यान उपचार सुरु असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

थोडक्यात बातम्या-

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now