सावधान! गरोदरपणात नजर धूसर होतेय? दुर्लक्ष करू नका, ‘या’ गोष्टींकडे लक्ष द्या

On: April 9, 2026 3:01 PM
Pregnancy Eye Care
---Advertisement---

Pregnancy Eye Care | गर्भधारणा हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील संवेदनशील आणि महत्त्वाचा टप्पा मानला जातो. या काळात शरीरात मोठ्या प्रमाणात हार्मोनल बदल होतात, ज्याचा परिणाम विविध शारीरिक प्रक्रियांवर दिसून येतो. यामध्ये डोळ्यांच्या आरोग्यावरही प्रभाव पडू शकतो. या संदर्भात तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे आवश्यक ठरते.

गरोदरपणात दिसणारे डोळ्यांचे बदल :

गर्भधारणेदरम्यान अनेक महिलांना दृष्टी थोडी धूसर झाल्यासारखी वाटू शकते. हार्मोन्समधील बदल आणि शरीरात पाणी साचण्याची प्रवृत्ती यामुळे असे घडते. चष्मा वापरणाऱ्या महिलांना चष्मा घातल्यानंतरही स्पष्ट दिसत नसल्याची तक्रार जाणवू शकते. चष्मा स्वच्छ असतानाही दृष्टी थोडी अस्पष्ट राहण्याची शक्यता असते.

याशिवाय डोळ्यांमध्ये कोरडेपणा किंवा जळजळ वाढल्याचेही अनेक महिलांना जाणवते. विशेषतः संगणकावर किंवा स्क्रीनसमोर दीर्घकाळ काम करणाऱ्या महिलांमध्ये ही समस्या अधिक वाढू शकते. काही महिलांना नियमित वापरल्या जाणाऱ्या कॉन्टॅक्ट लेन्स वापरताना त्रास होऊ शकतो. डोळ्यांत जळजळ, कोरडेपणा किंवा अस्वस्थता जाणवल्याने लेन्स वापरणे कठीण होऊ शकते. काही प्रकरणांमध्ये पापण्यांवर सूजही दिसून येते.

Pregnancy Eye Care | कधी घ्यावा नेत्रतज्ज्ञांचा सल्ला :

काही महिलांमध्ये गरोदरपणात डोळ्यांशी संबंधित गंभीर समस्या उद्भवू शकतात. विशेषतः ज्यांना गर्भधारणेदरम्यान उच्च रक्तदाब होतो, ज्याला प्रीक्लॅम्पसिया (Preeclampsia) म्हणतात, अशा महिलांमध्ये दृष्टीवर अधिक परिणाम होऊ शकतो. तसेच आधीपासून मधुमेह असलेल्या किंवा गर्भधारणेदरम्यान मधुमेह झालेल्या महिलांमध्येही दृष्टीसंबंधी अडचणी वाढण्याची शक्यता असते. (Pregnancy Eye Care)

जर अचानक कमी दिसू लागणे, डोळ्यांमध्ये तीव्र कोरडेपणा किंवा अस्वस्थता जाणवणे, किंवा आधीपासून दृष्टीदोष असल्यास अशा वेळी तातडीने नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. बहुतेक वेळा लहान दृष्टीदोष प्रसूतीनंतर आपोआप सुधारतात. डोळे कोरडे पडण्याची समस्या असल्यास डॉक्टरांनी सुचवलेले ल्युब्रिकेशन ड्रॉप्स उपयोगी ठरतात. गर्भधारणेदरम्यान नवीन चष्मा घेणे टाळण्याचा सल्ला दिला जातो, कारण प्रसूतीनंतर दृष्टी पुन्हा पूर्ववत होण्याची शक्यता असते. तसेच या काळात किंवा स्तनपान सुरू असताना लॅसिक (LASIK) सारखी रिफ्रॅक्टिव्ह शस्त्रक्रिया न करण्याचा सल्लाही तज्ज्ञ देतात.

News title : Vision Changes During Pregnancy

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now