“पंकजा मुंडेंना पाडण्यासाठी धनंजय मुंडेंचा डाव?”

On: April 25, 2024 6:09 PM
Sarangi Mahajan
---Advertisement---

Pankaja Munde | बीड जिल्ह्यात हाय व्होल्टेज लढत होत असून पंकजा मुंडेंना (Pankaja munde) महाविकास आघाडीच्या बजरंग सोनवणे यांचं तगडं आव्हान आहे. महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडेंनी (Pankaja munde) उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना धनंजय मुंडेंनी बजरंग सोनवणेंना लक्ष्य केलं.

पंकजा मुंडेंना बजरंग सोनवणेंचं आवाहन

विरोधी उमेदवार बहुरंगी आहे, बिगरशेतीचा शेतकरीपुत्र आहे. आम्ही कधी जातपात पाहिली नाही. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आम्ही मराठा समाजाच्या पाठीशी सरकार म्हणून ठामपणे उभे राहिलो. समोरचा उमेदवार मराठा आरक्षणाच्या आंदोलनात कुठे होता? कुणबी प्रमाणपत्र घेण्यासाठी मात्र ते सर्वात पुढे, हे काय समाजाचे भले करणार?, अशा शब्दात धनंजय मुंडेंनी सोनवणेंवर टीका केली होती.

धनंजय मुंडेंनी मराठा आरक्षणाचा विषय छेडल्याने राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा रंगली आहे. त्यात, विरेंद्र पवार यांनी धनंजय मुंडेंना प्रत्युत्तर दिलं. धनंजय मुडेंना मराठा आरक्षणावर बोलण्याचा अधिकार नाही, असं मराठा समन्वयक विरेंद्र पवार यांनी म्हटलं.

“पंकजा मुंडेंना पाडण्यासाठी षडयंत्र”

धनंजय मुंडेंसारखे लोक कुठल्याही थराला जाऊ शकतात, काहीही संबंध नसताना मराठा आरक्षणाचा विषय काढून निवडणुकीमध्ये जातीय रंग देण्याचा काम मुंडेंनी केलं आहे. नाहक वंजारी आणि मराठा असा वाद निर्माण केला जात आहे, असं त्यांनी म्हटलंय.

पंकजा मुंडेंना पाडण्यासाठी तुम्ही हे करत आहात का, येथे मराठा आणि वंजारी समाजात वाद निर्माण होऊन मराठा समाजाने पंकजा मुंडेंना मतं देऊ नये असं षडयंत्र रचलंय का, हा संशय आम्हाला येत असल्याचंही विरेंद्र पवार यांनी म्हटलं.

दरम्यान, निवडणुकांपूर्वी राज्यात तापलेल्या मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) विषयाचं केंद्रस्थानही बीड जिल्हाच आहे. त्यामुळे येथील निवडणुकीकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

मोठी बातमी! नरेंद्र मोदी यांना निवडणूक आयोगाने बजावली नोटीस

चिन्मय मांडलेकरच्या लेकासाठी सुप्रिया पिळगावकरांची पोस्ट, म्हणाल्या…

एसी किंवा कूलरशिवायही घर होईल थंड; फक्त फॉलो करा ‘या’ टिप्स

‘…म्हणून मी खूप शहाणा झालो असं नाही’; शरद पवारांनी सुजय विखेंना झापलं

‘मी शब्दाचा पक्का’; हर्षवर्धन पाटील आणि विजय शिवतारेंबाबत अजित पवार स्पष्टच बोलले

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now