Virat Kohli Fan Viral Video l भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीचे चाहते प्रचंड आहेत. त्यामुळे विराट कोहलीच्या फॅन फॉलोइंगची लिस्ट देखील मोठी असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आता त्याची एक झलक पाहण्यासाठी त्याचे चाहते कोणत्याही थराला जात असतात. अशातच सध्या विराट कोहली आयपीएल 2024 मध्ये खेळताना एक गमतीशीर घटना घडली आहे. आयपीएलमध्ये काल झालेल्या सामन्यात विराट कोहलीने तुफानी खेळी केली आणि कोहली आणि कार्तिकच्या खेळीच्या जोरावर आरसीबीने पंजाब किंग्जचा 4 गडी राखून पराभव केला.
Virat Kohli Fan Viral Video l विराटला भेटण्यासाठी चाहता थेट मैदानात :
या सामन्यात विराट कोहली उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि फलंदाजी करताना दिसला. यादरम्यान त्याची क्रेझ त्याच्या होम ग्राउंड चिन्नास्वामीवरही पाहायला मिळाली. अशातच कोहलीला भेटण्यासाठी एका चाहत्याने सुरक्षेला चकमा देत त्याला भेटण्यासाठी मैदानात प्रवेश केला. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
पंजाब किंग्जविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात कोहलीला भेटण्यासाठी एका चाहत्याने सुरक्षा तोडली आणि मैदानात येऊन कोहलीच्या पायाला हात लावू लागला. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की एक चाहता वेगाने धावत कोहलीच्या पाया पडत असल्याचे दिसत आहे. यानंतर त्याने विराटला मिठीही मारली. मात्र, सुरक्षारक्षक तेथे पोहोचतो आणि त्याला तेथून घेऊन गेला. सुरक्षा भंग करून चाहत्याने कोहलीला भेटण्याचा प्रयत्न करण्याची ही पहिलीच वेळ नाही तर हे अनेकवेळा घडले आहे.
A fan breached the field and touched Virat Kohli's feet.
– King Kohli, an icon! ❤️pic.twitter.com/s82xq8sKhW
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 25, 2024
विराट कोहलीने 650 चौकार केले पूर्ण :
आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहलीने आयपीएलमध्ये 650 चौकार पूर्ण केले आहेत. त्याने सात चौकार मारून हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. या दिग्गज फलंदाजाने आयपीएलमध्ये आतापर्यंत 238 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने सात शतके आणि 50 अर्धशतकांच्या मदतीने 7284 धावा केल्या आहेत. गेल्या सामन्यात विराट कोहलीने चेन्नईविरुद्ध 21 धावा केल्या होत्या. या सामन्यात सीएसकेने आरसीबीचा सहा गडी राखून पराभव केला आहे.
News Title : Virat Kohli Fan Viral Video
महत्त्वाच्या बातम्या-
विराट ‘नंबर वन’! किंग कोहलीची ऐतिहासिक खेळी, ठरला पहिला भारतीय
लेकीला उमेदवारी न दिल्यानं विजय वडेट्टीवर नाराज?
लग्नाला 13 वर्षे झाली, गुड न्यूज कधी देणार? प्रिया बापट म्हणाली…
‘त्यावेळी जातीचे रंग’; कुशल बद्रिकेची पोस्ट व्हायरल
प्रसिद्ध अभिनेत्रीने गुपचूप उरकलं लग्न?, ‘त्या’ फोटोंमुळे चर्चांना उधाण






