BCCI कडून Virat Kohli बाबत मोठे अपडेट; टीम इंडियासाठी ‘ही’ आनंदाची बातमी

On: February 4, 2024 8:46 AM
Virat Kohli
---Advertisement---

Virat Kohli | भारतीय संघ सध्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना खेळत आहे. दुसऱ्या सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर यजमान टीम इंडिया मजबूत स्थितीत आहे. यशस्वी जैस्वालचे द्विशतक आणि जसप्रीत बुमराहचे सहा बळी भारताला सामन्यात मजबूत स्थितीत घेऊन आले. या सामन्यानंतर टीम इंडियाला जवळपास एक आठवड्याचा ब्रेक मिळणार आहे, पण टीम इंडियाला एक मोठा झटका बसला आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील उर्वरित सामन्यांसाठी विराट कोहलीच्या भारतीय संघात पुनरागमनाची स्थिती अद्याप अस्पष्ट आहे.

बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकारी किंग कोहलीशी त्याच्या आगामी काळातील उपस्थितीबद्दल लवकरात लवकर बोलण्याचा विचार करत आहेत. विराट कोहलीसाठी सध्या टीम इंडियात पुनरागमन करणे कठीण आहे. कोहली सध्या परदेशात असून त्याने आधीच दोन सामन्यांमधून ब्रेक घेतला आहे. अशातच तो तिसऱ्या सामन्यात सहभागी होणार की नाही हे स्पष्ट झालेले नाही. विराटने वैयक्तिक कारणास्तव सुट्टी घेतली आहे.

Virat Kohli बाबत मोठे अपडेट

वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, विराट कोहली सध्या देशाबाहेर आहे. तो संघात सामील होण्याच्या स्थितीत आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर किंवा बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकारी त्याच्याशी बोलणार आहेत. कोहलीने वैयक्तिक कारणामुळे इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता.

बीसीसीआयशी संबंधित असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, बीसीसीआयच्या प्रसिद्धीपत्रकात असे म्हटले आहे की, सर्वांसाठी कुटुंब प्रथम येते, विराट तेव्हाच खेळेल जेव्हा त्याला वाटेल की तो खेळण्याच्या स्थितीत आहे. पहिल्या दोन सामन्यांमधून माघार घेण्यामागे त्याचे वैयक्तिक कारण आहे.

IND vs ENG कसोटी मालिकेचा थरार

खरं तर शनिवारी विराट कोहलीचा जवळचा सहकारी आणि मित्र एबी डिव्हिलियर्सने एक मोठा खुलासा केला. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा लवकरच दुसऱ्यांदा आई बाबा होणार असल्याचे डिव्हिलियर्सने सांगितले. डिव्हिलियर्स कोहलीचा जवळचा मित्र असून ते दोघे आयपीएलमधील फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी मोठ्या कालावधीपर्यंत एकत्र खेळले आहेत. एबी डिव्हिलियर्सने त्याच्या YouTube चॅनलवर हा खुलासा केला.

टीम इंडियासाठी खुशखबर

सध्या सुरू असलेला दुसरा कसोटी सामना अय्यर आणि गिलसाठी अग्निपरीक्षा आहे. कारण शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांना इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात चांगला खेळ करावा लागेल कारण राजकोट येथे 14 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटीसाठी लोकेश राहुल तंदुरुस्त होऊ शकतो. इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित तीन कसोटी सामन्यांसाठीचा संघ दुसरी कसोटी संपल्यानंतर पुढील आठवड्यात जाहीर केला जाईल.

News Title- BCCCI has given a big update about IND vs ENG Test Series Virat Kohli and officials are going to discuss with him
महत्त्वाच्या बातम्या –

Investment | केवळ व्याजाच्या पैशातून कमवा लाखो रूपये; पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत बंपर परतावा

Ram Mandir | रामललाला 11 दिवसांत 11 कोटी रुपयांचे दान; 25 लाख भाविकांची अयोध्येला भेट

Poonam Pandey | मृत्यूची खोटी बातमी पसरवणं भोवलं; पोलिसांत तक्रार, मॅनेजरसोबत रचला होता कट

गोळीबार प्रकरण: शिवसेना नेत्याची 6 तासांची मॅरेथॉन शस्त्रक्रिया; 6 गोळ्या काढल्या, Shrikant Shinde भावूक

Virat Kohli आणि अनुष्का लवकरच दुसऱ्यांदा आई बाबा होणार; माजी खेळाडूचा मोठा खुलासा

Join WhatsApp Group

Join Now