अखेर विराट- गौतमचे झाले पॅच अप! मिठी मारून दिल्लीकरांची मने जिंकली

On: March 30, 2024 11:17 AM
Virat Kohli and Gautam Gambhir Hug Video
---Advertisement---

Virat Kohli and Gautam Gambhir Hug Video l विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील मतभेद सर्वांनाच माहित आहेत. आयपीएल 2013 मध्ये दोघांमध्ये वादाची ठिणगी सुरू झाली होती. यानंतर आयपीएल 2023 मध्ये त्याचे रुपांतर आगीत झाले. अशातच आता आयपीएल 2024 मध्ये त्यांचा वाद संपुष्टात आला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना आयपीएल 2024 मध्ये एम चिन्नास्वामी स्टेडियमवर सामना पार पडला आहे. या सामन्यात विराट कोहली आणि गौतम गंभीर पुन्हा एकदा आमनेसामने आहेत.

Virat Kohli and Gautam Gambhir Hug Video l विराट आणि गौतमचा व्हिडीओ व्हायरल :

या सामन्याच्या मधल्या वेळेत विराट कोहली आणि गौतम गंभीर एकमेकांना भेटताना दिसले आहे. त्यानंतर दोघेही सोशल मीडियावर लोकप्रिय झाले आहेत. विराटच्या नावावर गौतम गंभीरला अनेकदा ट्रोल करण्यात आले. नवीन उल हक गेल्या मोसमात वादाचा केंद्रबिंदू ठरला होता.

विराट आणि गंभीर यांच्यात जोरदार वाद झाल्यानंतर दोघांनाही दंड ठोठावण्यात आला आहे. आता वर्षभरानंतर हा वाद संपुष्टात आला आहे. त्यामुळे काल झालेल्या सामन्यातील व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

विराट पुन्हा आरसीबीचा ट्रबलशूटर बनला! :

RCB ने IPL 2024 ला पराभवाने सुरुवात केली. मात्र दुसऱ्या सामन्यात विराट कोहलीने संघात पुनरागमन केले. त्याने गेल्या सामन्यात अर्धशतक झळकावले आणि चिन्नास्वामीने संघाला विजयापर्यंत नेले. विराटने केकेआरविरुद्धही वन मॅन आर्मी असल्याचे सिद्ध केले.

या सामन्यात कोहलीने 59 चेंडूत 4 षटकार आणि तब्बल चौकार मारत 84 धावांची दमदार खेळी केली. विराटशिवाय कॅमेरून ग्रीननेही 33 धावा करत त्याला साथ दिली. यानंतर आरसीबी संघाने फायटिंग स्कोअर गाठला आहे.

विराट कोहलीने नाबाद 84 धावा करत आरसीबीला 182 धावांपर्यंत नेले. या सामन्यात KKR चा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गेल्या सामन्यात केकेआर संघासाठी स्फोटक अष्टपैलू आंद्रे रसेलने शानदार अर्धशतक झळकावले होते. त्याने आपल्या खेळीने हैदराबादचा धुव्वा उडवला होता.

News Title : Virat Kohli and Gautam Gambhir Hug Video

महत्त्वाच्या बातम्या-

राज्यात अवकाळी पावसाचा इशारा; ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी

तूळ राशीसह या 3 राशीच्या लोकांना आजचा दिवस अत्यंत महत्वाचा

कोरोना काळात ताट, वाट्या, थाळ्या का वाजवायला लावल्या?, मोदींचा सर्वात मोठा खुलासा

बॅालिवूडमधील ‘या’ दिग्गज अभिनेत्यासोबत कंगनाने केली स्वतःची बरोबरी!

मित्रानं ऐनवेळी घेतली माघार!, शरद पवार आता काय निर्णय घेणार?

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now