Ram Mandir | हमारे राम आए हैं…, विराट आणि अनुष्काचा आनंद गगनात मावेना

On: January 16, 2024 8:01 PM
Ram Mandir invitation
---Advertisement---

Ram Mandir | प्रभू श्रीराम यांची जन्मभूमी असलेल्या अयोध्येत येत्या 22 जानेवारीला राम मंदिराचा (Ram Mandir) उद्धाटन सोहळा होणार आहे. यासाठी देशभरात जय्यत तयारी सुरु आहे. या सोहळ्यासाठी साधू-मुनींसह अनेक दिग्गजांना निमंत्रण देण्यात आलं आहे. यात अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) यांचेही नाव सामील झाले आहे.

सोशल मीडियावर अनुष्का आणि विराट यांचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोतून त्यांनाही निमंत्रण मिळाले असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विरुष्का देखील अयोध्येत होणाऱ्या या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार ठरणार आहेत. या सोहळ्याचे बॉलीवूड सोबतच क्रिकेट जगतातील अनेक दिग्गजांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. आज यात अनुष्का आणि विराटचेही नाव सामील झाल्याने चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे.

विरुष्का’ला मिळालं निमंत्रण-

सोशल मीडियावर अनुष्का आणि विराट यांचा फोटो व्हायरल होत आहे. यात दोघांच्या हातात प्राण प्रतिष्ठापणेची निमंत्रण पत्रिका दिसून येत आहे. अनुष्का शर्मासाठी हा क्षण अत्यंत महत्वाचा असल्याचं म्हटले जात आहे. कारण, तिचा जन्म अयोध्येमध्येच झाला आहे. अयोध्यामधील मिलिट्री हॉस्पिटलमध्ये तिचा जन्म झाला. तीचे वडील अजय कुमार शर्मा अयोध्येमध्ये इंडियन आर्मीच्या डोगरा रेजिमेंटमध्ये होते. त्यामुळे अभिनेत्री अनुष्कासाठी हा क्षण अत्यंत जवळचा असणार आहे.

अनुष्का आणि विराटसोबतच अभिनेते रजनीकांत, महानायक अमिताभ बच्चन, रणबीर कपूर, आलिया भट्ट, राम चरण, दीपिका चिखलिया, अरुण गोविल, अनुपम खेर, आयुष्मान खुराणा, जॅकी श्रॉफ, अक्षय कुमार, केजीएफ स्टार यश, चिरंजीवी, धनुष, प्रभास, माधुरी दीक्षित यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे.

प्राणप्रतिष्ठापणेपूर्वी अनेक कार्यक्रमांचे आयोजन-

दरम्यान, राम मंदिराच्या (Ram Mandir) प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी 14 ते 25 जानेवारी दरम्यान शरयूच्या तीरावर ‘श्री राम नाम महायज्ञ’ या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी 21 हजार पुजारी येणार आहेत. या अभूतपूर्व सोहळ्यासाठी जोरदार तयारी करण्यात येत आहे.

‘श्री राम नाम महायज्ञ’ करण्यासाठी 21 हजार पुजारी प्रभू रामाचे सासर असलेल्या नेपाळ येथून अयोध्येला पोहोचणार आहेत. राम मंदिरापासून (Ram Mandir) दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या शरयू नदीच्या घाटावर याची तयारी करण्यात आली आहे. यासाठी शंभर एकरमध्ये 1008 तंबूंची टेंट सिटी उभारण्यात आली आहे. तसेच महायज्ञ करण्यासाठी 11 थरांचा यज्ञमंडप बांधण्यात येत आहे. अशा या अभूतपूर्व सोहळ्याची सर्वच जण आतुरतेने प्रतिक्षा करत आहेत.

News Title: Virat and Anushka receives Ram Mandir invitation

महत्वाच्या बातम्या- 

Aishwarya ने सलमान खानबाबत केला सर्वात मोठा खुलासा!

Asim sarode | ‘अत्यंत फालतू माणूस’; असीम सरोदेंची भगतसिंह कोश्यारींवर टीका

Adult Movies | ‘हे’ चित्रपट फॅमिलीसोबत चुकून पण पाहू नका!

Adah Sharma | अदा शर्माच्या चाहत्यांसाठी मोठी गुड न्यूज!

Acharya Chanakya | यशस्वी व्हायचं असेल तर ‘अशा’ लोकांपासून लांबच राहा!

Join WhatsApp Group

Join Now