Viral Video Clips । चालत्या गाडीवर ‘चलो इश्क लढाये’! पाहा तुफान व्हायरल होत असलेला व्हिडीओ

On: January 16, 2024 6:03 AM
Viral Video clips
---Advertisement---

Viral Video clips | प्रसिद्धीसाठी सोशल मीडियावरील फॉलोअर्संना आकर्षित करण्यासाठी कोण कोणत्या थराला जाईल याची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. हे सोशल मीडियाचे जग असून इथे कोणतीच गोष्ट लपून राहत नाही. आपला व्हिडीओ व्हायरल होऊन प्रसिद्धी मिळेल या हेतूने अनेकजण काहीही करत असतात. जगात असे अनेक लोक आहेत जे कुठेही विचित्र गोष्टी करायला लागतात आणि लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतात. याचाच प्रत्यय देणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

आजकाल मेट्रो आणि ट्रेनमध्येही लोक असे काम करताना दिसतात की त्यांना पाहून सगळ्यांनाच राग येईल. रील्सच्या या जगात तरूणाई भलतेच काम करताना दिसते. मेट्रो किंवा ट्रेनमध्ये गाणी लावणे किंवा नाचणे आता सामान्य झाले आहे असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही. काही कपल्स सार्वजनिक ठिकाणी रोमान्स करताना देखील दिसतात.

चलो इश्क लढाये…

आता एका प्रेमी युगुलाचा रोमान्स चक्क चालत्या बाईकवर सुरू झाला आहे. सध्या अशाच एका जोडप्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, तो पाहून लोक संताप व्यक्त करत आहेत. व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, संबंधित कपल प्रसिद्धीसाठी असे चाळे करत आहे. हा व्हिडीओ मुंबईतील असल्याचे बोलले जात आहे.

Viral Video Clips अन् संताप

दरम्यान, व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, एक जोडपे चालत्या स्कूटरवर रोमान्स करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की मुलगा स्कूटर चालवत आहे आणि मुलगी त्याच्या मांडीवर बसली आहे. यावेळी दोघांनीही शाल परिधान केली आहे. तसेच दोघांनीही वाहतूक नियमांची पायमल्ली केली.

 

दोघांनीही हेल्मेट घातले नव्हते. अशा परिस्थितीत अपघात झाला तर त्यांची काय अवस्था होईल याची कल्पना न केलेलीच बरी. ही घटना रस्त्यावरून जात असलेल्या एका प्रवाशाने आपल्या कॅमेऱ्यात कैद केली, जी काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाली. आता या जोडप्यावर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी लोक करत आहेत. विशेष म्हणजे ही घटना मुंबईतील असल्याची माहिती आहे.

व्हिडीओ शेअर करणाऱ्या युजरने कॅप्शनच्या माध्यमातून सांगितले की, हे साहसी जोडपे वांद्रे रेक्लेमेशनमध्ये त्यांच्या अपारंपरिक स्कूटर राईडने सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसले. मुंबई पोलीस, आम्ही तुम्हाला विनंती करतो की, रस्त्यावरील प्रत्येकाची सुरक्षा ही आपल्या हातात आहे. एकूणच संबंधित युजरने जोडप्यावर कारवाईची मागणी केली.

 महत्त्वाच्या बातम्या –

Mumbai News | संक्रांतीच्यादिवशी मुंबई हादरली; धक्कादायक बातमी समोर

Surbhi Chandna | ‘इश्कबाज’ फेम अनिकाला मिळाला रियल लाईफ ‘शिवाय’; लवकरच करणार लग्न

Black Pepper | ब्लडप्रेशर कंट्रोलमध्ये ठेवायचं असेल तर करा ‘हा’ सोपा उपाय

Bigg Boss 17 | सासऱ्याचं नाव घेत अंकिता लोखंडेचा मोठा खुलासा!

Sania Mirza शोएब मलिकसोबत घटस्फोट घेणार?; उचललं मोठं पाऊल

Join WhatsApp Group

Join Now