“मुख्यमंत्री होता तेव्हा काय केलं नाही आता 48 तासात काय दिवे लावणार?”

On: December 7, 2022 6:18 PM
---Advertisement---

पुणे | शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी कर्नाटक प्रश्नावरून शरद पवार आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत जहरी टीका केली आहे.

विजय शिवतारे (Vijay Shivtare) हे शिंदे गटाची बाजू मांडत असतांना शरद पवार यांच्यावर हल्लाबोल करत त्यांची भूमिका म्हणजे राजकारण असल्याचा आरोपही केला आहे.

48 तासात बेळगावला जाऊन तुम्ही काय दिवे लावणार ? तुम्ही चारवेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होता तुम्ही काय केलं ? हे फक्त राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे, अशी टीका शिवतारेंनी केली आहे.

संजय राऊतांना स्किझोफ्रेनिया झाला आहे. त्यांना उपचाराची गरज आहे. त्यांनी सामना ऑफीसपासून जवळ असलेल्या पत्राचाळीतील जी घरं रस्त्यावर आलेत त्या मराठी बांधवांची काळजी करावी असा टोलाही शिवतारे यांनी लगावला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमा वादाचा मुद्दा अधिक प्रभावी आणि आक्रमकपणे मांडला जात असून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडली जात नाहीये.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now