“एक राक्षस तर दुसरा ब्रम्हराक्षस, मला दोघांचा खात्मा करायचाय”

On: March 24, 2024 4:10 PM
Sharad Pawar vs Ajit Pawar
---Advertisement---

पुणे | आधी देशात ईस्ट इंडिया कंपनी होती, ती गेली. आता पवारांची कंपनी आली. शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) म्हणजे एक राक्षस आणि दुसरा ब्रम्हराक्षस आहे. दोघांचा मला खात्मा करायचा आहे. यांनी लोकांवर प्रचंड अन्याय केले आहेत, अशी टीका शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी केली आहे.

शिवतारेंची शरद पवार- अजित पवारांवर टीका

मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर शिवतारे यांनी आज पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. शिवसैनिक, पदाधिकारी यांच्यासह सरपंच आणि उपसरपंच देखील बैठकीला उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर घणाघाती टीका केलीये.

“अजित पवारांनी खूप पाप केलीत”

अजित पवारांनी खूप पाप केली आहेत. अख्ख्या राज्याला हा ग्रामीण दहशतवाद हा शब्द माहिती पडेल. 70 वर्षात यांनी केलं काय फक्त घुसले यांनी फक्त घुसखोरी केली आहे, असं विजय शिवतारे म्हणालेत.

कपट कारस्थानी पवारांनी अनेकांना संपवलं. आता यांना बाजार दाखवण्याची वेळ आली आहे, अशा शब्दात शिवतारेंनी पवारांवर टीका केली आहे. तसेच मला फक्त अजित पवार यांना हरवायचं आहे, असं शिवतारे म्हणालेत.

मी शरद पवार यांचा माणूस असल्याचं सांगितलं जातं आहे. पण असा आरोप करणाऱ्यांना मी सांगू इच्छितो, असा नालायक पणा मी कधीच करणार नाही. मी लोकसभा निवडणूक लढतोय ते जिंकण्यासाठीच. ही लढाई पवारांचा विरोधात आहे, असंही शिवतारेंनी म्हटलंय.

शरद पवार आणि अजित पवार यांना देखील माहितीय विजय शिवतारे कोण आहेत. या रावणाचा वध करण्यासाठी बापू ठाम आहे, असं म्हणत त्यांनी लोसकभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केलीये.

महत्त्वाच्या बातम्या- 

एक राक्षस आणि दुसरा ब्रम्हराक्षस

…म्हणून अंकिता लोखंडेनं स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटासाठी एक रूपयाही घेतला नाही!

“भररस्त्यात त्याने माझ्या ब्रेस्टला….”, मराठी अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव

लोकसभा निवडणुकीआधी मनोज जरांगे मोठा निर्णय घेणार?

‘5 कोटी रूपये येतात कुठून?’; इंदुरीकर महाराजांनी नेत्यांना झापलं

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now