‘मला सिगारेट ओढायला प्रचंड आवडतं, दिवसाला..’, विद्या बालनचा चकित करणारा खुलासा

On: April 26, 2024 10:38 AM
Vidya Balan Addicted To Smoking After The Dirty Picture
---Advertisement---

Vidya Balan | द डर्टी पिक्चर, नियत, कहाणी,हमारी अधुरी कहाणी,भूल भूलैय्या अशा सुपरहीट चित्रपटात काम करणारी अभिनेत्री विद्या बालन आजही नवोदित अभिनेत्रींना आपल्या सौंदर्याने आणि अदांनी मागे टाकते. विद्या नेहमीच काही न काही कारणांनी चर्चेत राहत असते. सध्या ती ‘दो और दो प्यार’ या तिच्या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

यातील विद्या बालनच्या भूमिकेचं कौतुक होत आहे. नुकतीच तिने एक मुलाखत दिली आहे. यात अभिनेत्रीने मोठा खुलासा केला आहे. विद्याने सिगारेटबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. विद्याने ‘द डर्टी पिक्चर’ सिनेमात दिवंगत अभिनेत्री सिल्क स्मिता यांची भूमिका साकारली होती. यात तिने सिगारेट ओढली होती. याचे अनेक सीन्स चित्रपटात पाहावयास मिळतील.

या चित्रपटाची शूटिंग सुरू असताना विद्याला सिगारेट पिण्याची सवय लागली होती. तिला याचा वास आवडू लागला होता. याबाबत विद्याने एक खुलासा केला आहे. तिला ही सवय कशी लागली, तिची सवय कशी सुटली याबाबत अभिनेत्री बोलताना दिसून आली.

काय म्हणाली विद्या?

सिगारेट कशी प्यायची असते मला माहिती आहे. पण मी कधीच सिगारेटला हात लावू शकली नाही.तुम्हाला वाटत असेल मी हे काय बोलतीये, पण काही भूमिका अशा असतात ज्यामध्ये तुम्ही नकली अभिनय करु शकत नाही. म्हणून मी भूमिकेसाठी सिगारेट ओढली होती. सुरुवातीला माझ्या मनात एक भीती होती. कारण सिगारेट पिणाऱ्या मुलींबद्दल लोकांनी त्यांच्या मनात एक धारणा तयार केली होती. पण आता कोणी पूर्वीसारखं जज करत नाही. असं विद्या (Vidya Balan ) म्हणाली.

दिवसाला 2 ते 3 सिगारेट ओढायची विद्या

पुढे तिने सांगितलं की, ‘द डर्टी पिक्चर’ चित्रपटामुळे मला सिगारेट पिण्याची सवय लागली होती. मी दिवसाला 2 ते 3 सिगारेट प्यायचे. ही गोष्ट मी कॅमेऱ्यासमोर बोलायला हवी, असं मला वाटत नाही. पण, सांगायला गेलं तर मला सिगारेट प्यायल्याने आनंद मिळतो. विद्याच्या या वक्तव्यामुळे ती चर्चेत आली आहे. तिचं हे विधान आता चर्चेत आलंय. पुढे तिला तू आजही सिगारेट ओढतेस का?, असा प्रश्न करण्यात आला. यावर विद्याने ‘नाही’ असं उत्तर दिलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vidya Balan (@balanvidya)

यावेळी विद्याने अजून एक किस्सा सांगितला. कॉलेजमध्ये असताना देखील मला सिगारेटचा वास प्रचंड आवडायचा. मी बस स्टॉपवर जी व्यक्ती सिगारेट पित असेल त्यांच्या बाजूला बसून सिगारेटचा वास घ्यायची, असंही विद्याने सांगितलं. विद्याच्या या अजीब सवयीबद्दल जाणून सर्वच चकित झाले आहेत. दरम्यान, विद्याच्या (Vidya Balan ) वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास ती लवकरच ‘भूल भूलैय्या 3’ मध्ये दिसणार आहे.यात ती पुन्हा एकदा मंजुलीकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

News Title : Vidya Balan Addicted To Smoking After The Dirty Picture

महत्त्वाच्या बातम्या –

विवाह, गृहप्रवेश ते नामकरण..मे महिन्यात शुभ मुहूर्त किती आणि कधी?; जाणून घ्या संपूर्ण यादी

12 हजारांपेक्षाही कमी किंमतीत खरेदी करा Samsung चा लेटेस्ट 5G स्मार्टफोन; जाणून घ्या ऑफर्स

तुम्ही खात असलेलं तूप शुद्ध आहे की अशुद्ध?, ‘या’ टिप्समुळे फसवणूक टळू शकते

राहुल गांधीचं भवितव्य आज ठरणार; देशातील 88 मतदारसंघात मतसंग्राम

‘या’ भागावर अवकाळी पावसाचं संकट कायम; यलो अलर्ट जारी

Join WhatsApp Group

Join Now