Vicky Kaushal | विकी कौशल (Vicky Kaushal), रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांची प्रमुख भूमिका असलेला ‘छावा’ चित्रपट (Chhaava Movie) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. येत्या १४ फेब्रुवारीला ‘छावा’ (Chhaava Release Date 14th February) संपूर्ण देशभरात प्रदर्शित होणार आहे. ‘छावा’ (Chhaava) चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच शिवप्रेमींमध्ये या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. या चित्रपटात अभिनेता विक्की कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या (Chhatrapati Sambhaji Maharaj) भूमिकेत दिसणार आहे, तर दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना महाराणी येसूबाईंच्या (Maharani Yesubai) भूमिकेत झळकणार आहे.
सध्या दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर (Director Laxman Utekar), विकी कौशल आणि रश्मिका मंदाना चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. अशातच, एका मुलाखतीत विकी आणि लक्ष्मण उतेकर यांनी ‘छावा’च्या शूटिंगदरम्यानचे काही भावूक करणारे क्षण सांगितले.
“…बघून विकी कौशल ढसाढसा रडला”
आगामी चित्रपट ‘छावा’च्या पार्श्वभूमीवर दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि विक्की कौशल यांनी दोघांनीही ‘छावा’च्या शूटिंगदरम्यानचे अनुभव, थरारक आणि अंगावर शहारे आणणारे किस्से सांगितले. मुलाखतीदरम्यान विकी कौशल आणि लक्ष्मण उतेकर यांना सेटवर घडलेल्या भावनिक प्रसंगांबद्दल विचारण्यात आले. त्यावेळी दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे दृश्य चित्रित करताना सेटवर घडलेला एक डोळे पाणावणारा प्रसंग सांगितला.
सेटवरच्या भावनिक प्रसंगांबद्दल बोलताना लक्ष्मण उतेकर म्हणाले की, “आम्ही रायगडाचा सेट फिल्मसिटीतील हेलिपॅडवर उभारला होता. यासाठी आमचे प्रोडक्शन डिझायनर प्रत्यक्ष रायगडावर गेले होते आणि त्यांनी अभ्यास करून अगदी हुबेहूब तो सेट तयार केला होता. त्या काळी महाराजांचा दरबार जसा असेल, अगदी तसाच दरबार त्यांनी साकारला होता. त्यावेळी आम्हाला छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा सीन शूट करायचा होता. त्या शूटवेळी सेटवर ७०० ते ८०० लोक उपस्थित होते आणि राजे सिंहासनावर जाऊन बसतात, असा सीन आम्ही शूट करू लागलो. आम्ही सेटवर कोणताही शॉट दोन ते तीन टेकपेक्षा जास्त घेतला नव्हता. विकी आणि माझ्यात याबाबत खूपच चांगले बॉन्डिंग आहे, त्यामुळे अनेकदा आम्ही डोळ्यांनीच एकमेकांशी बोलतो. परंतु, त्या एका सीनसाठी आम्हाला १५ टेक घ्यावे लागले. सिंहासनाला पाहून ज्या ठिकाणी उभे राहायचे होते, तिथे उभे राहिल्यावर विकीच्या (Vicky Kaushal) डोळ्यांतून घळाघळा पाणी वाहत होते.”
Title : vicky kaushal emotional moment on chhaava movie set






