‘अंकितासोबत लग्न…’; विकी जैनचा धक्कादायक खुलासा

On: February 28, 2024 2:48 PM
Ankita Lokhande-Vicky Jain
---Advertisement---

Ankita Lokhande | अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन यांच्या (Vicky Jain ) वैवाहिक आयुष्यात पुन्हा कलह निर्माण झाल्याचं म्हटलं जात आहे. दोघेही ‘बिग बॉस 17’ मुळे मागे चर्चेत होते. आता नुकताच झालेल्या मुलाखतीत अंकिताचा (Ankita Lokhande) पती आणि उद्योजक विकी जैन याने मोठा खुलासा केला आहे.

विकी जैनच्या खुलाश्यामुळे सर्वत्र याचीच चर्चा होत आहे. मला कधी अंकिता सोबत लग्न करायचं नव्हतं, असं वक्तव्य विकी याने केलं आहे. त्यामुळे दोघांच्या संसारात पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली काय, अशा चर्चा आता होत आहेत.

“…तेव्हा अंकिता लग्न करण्याच्या स्थितीत नव्हती”

भारती सिंग आणि हर्ष लिम्बाचिया यांच्या पॉडकास्टमध्ये विकी जैनने मोठा खुलासा केला. “आमची लाईफस्टाईल पूर्णपणे वेगळी होती. त्यात विकी हा बिलासपूर येथे राहायचा आणि मी मुंबईत. त्याला नेहमी वाटायचं की, त्याने बिलासपूर मुलीसोबतच लग्न केलं पाहिजे. त्यामुळे मला विकी म्हणाला होता की, लग्न होऊ शकत नाही.”, असा खुलासा अंकिताने (Ankita Lokhande) केला.

यावर पुढे विकी जैननेही प्रतिक्रिया दिली. “अंकिताने मला बोलायची संधी दिलीच नाही कधी. त्यामुळे मी काही बोलूच शकलो नाही. मला असं वाटायचं प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते. जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा अंकिता लग्न करण्याच्या स्थितीत नव्हती आणि मलाही तेव्हा असं काही वाटलं नाही.”, असं विकी जैन म्हणाला.

विकी-अंकिताच्या विवाहाला घरच्यांचा विरोध

विकी जैनची आई रंजना जैन यांनी मागे एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं की, विकीने अंकितासोबत लग्न केलं आहे. आमचा दोघांच्या नात्याला कायम विरोधच होता. ‘बिग बॉस 17’ मध्येही रंजना जैन यांनी अंकितावर अनेक आरोप केले होते.

तेव्हा अंकिताची (Ankita Lokhande) बाजू घेण्यासाठी बरीच मंडळी धावून आली होती. मात्र अंकिताची सासू किती वाईट आहे, अशा चर्चा तेव्हा झाल्या. ‘बिग बॉस 17’ मुळे विकी जैनची आई प्रसिद्धी झोतात आली. ‘बिग बॉस 17’ मध्ये अंकिता आणि विकी यांचे सतत वाद व्हायचे. दोघांचं नातं घटस्फोटापर्यंत पोहोचलं होतं. पण शो संपताच दोघांनी नव्याने सुरुवात केली.

News Title- Vicky Jain shocking revelation about Ankita Lokhande

महत्त्वाच्या बातम्या –

विराट कोहलीनंतर त्याचा मित्रही झाला ‘बाबा’, चिमुकल्या परीचं आगमन

आणखी एक बॉलिवूड अभिनेत्री अडकणार विवाहबंधनात; प्रियकरासोबत घेणार सातफेरे

गाडी अडवली म्हणून अभिनेत्रीने होमगार्डचे कपडे फाडले, फोन हिसकावला; गुन्हा दाखल

“मनोज जरांगे कोणाला माहित नव्हता, आज तो शरद पवारांचा बाप झालाय”

जरांगे विरूद्ध फडणवीस वाद आणखी वाढणार?; जरांगेंचा पुन्हा गंभीर इशारा

Join WhatsApp Group

Join Now